लोगो - 42519
क्यूआर कोड - 42520
वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत मिळवा मार्गदर्शन
‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यातर्फे मार्गदर्शनपर चर्चासत्र
पुणे, ता. ९ : वैद्यकीय शिक्षणाबाबत तुमच्या मनात शंका आहेत का!, तुम्हाला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशाबाबत योग्य मार्गदर्शन हवंय! अहो, मग हे ‘सकाळ विद्या’च्या ‘एमबीबीएस ॲडमिशन सेमिनार २०२६’ मध्ये तुम्ही नक्कीच सहभागी व्हा. होय, या सेमिनारमध्ये तुम्हाला वैद्यकीय शिक्षणाबाबत तुमच्या मनात असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
‘सकाळ विद्या’च्या वतीने आयोजित आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, कोल्हापूर, सातारा येथे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केली आहेत. त्यातील कोल्हापूरमधील सत्र देवल क्लब हॉल येथे १६ मे रोजी होणार आहे. यात वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, ‘नीट’ परीक्षेतील कट-ऑफनुसार महाविद्यालयांची निवड, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सचिन वाडेकर आणि डॉ. नीलेश मोहिते यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना, पालकांना मार्गदर्शन करणार आहेत..
इन्फोबॉक्स :
‘एमबीबीएस करायचे आहे, मग ते भारतात किंवा परदेशात करायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन सेमिनारमध्ये करण्यात येणार आहे. एमबीबीएस प्रवेशाची प्रक्रिया नेमकी कशी असते, हे तुम्हाला सांगण्यात येईल. वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट विद्यापीठे कोणती, शुल्क किती असते, अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकणार आहेत.’
- डॉ. नीलेश मोहिते, मार्गदर्शक
.........
इन्फोबॉक्स :
‘नीट परीक्षा दिली ‘आता पुढे काय?’ अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सेमिनारमध्ये मिळणार आहेत. एमबीबीएस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आजच्या घडीला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. वैद्यकीय शिक्षण भारतात आणि परदेशात करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्ही या सेमिनारमध्ये नक्की सहभागी व्हाव.’’
- डॉ. सचिन वाडेकर, मार्गदर्शक
.........
*हे आहे ‘सकाळ विद्या’चे वैशिष्ट्य :*
- विनामूल्य सेमिनार
- मोफत वैयक्तिक समुपदेशन
- सरप्राइज गिफ्ट
- ३० दिवसांसाठी ‘व्हॉटस् अॅप’द्वारे मार्गदर्शन
..........
*सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक :*
(नावनोंदणीसाठी क्यूआर कोड सोबत जोडला आहे.)
......
*कोल्हापूरमधील चर्चासत्र :*
कधी : शनिवारी, १६ मे २०२६
कोठे : देवल क्लब हॉल, कोल्हापूर
केव्हा : सकाळी १० वाजता.
............
*अधिक माहितीसाठी :*
८८८८८०१४४१
९३५९६१११३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.