कोल्हापूर

सुधारित पन्हाळगडावर सहा दिवासात १८६.९ मि.मी.पावसाची नोंद, तीन वृक्ष उन्मळून पडले

CD

04987

पन्हाळगडावर सहा दिवसांत
१८६.९ मिमी पावसाची नोंद

तीन वृक्ष उन्मळून पडले

सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. २४ ः मे महिन्याच्या मध्यावर ज्यावेळी कडाक्याच्या उन्हे अनुभवायची त्याऐवजी सध्या पन्हाळगडावर सोसाट्याचा वारा ,दाट धुके व धो धो कोसळणारा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आषाढ महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सहा दिवसांत १८६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाऱ्यामुळे गडावर तीन वृक्ष उन्मळून पडले .
पन्हाळगडावर ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात सरासरी ३४.५ इतक्या पावसाची नोंद होते. यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गडावर गुरुवारअखेर सहा दिवसांत १८६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस नेहमी पडणाऱ्या पावसाच्या चौपटीहून जास्त असल्याचे कृषी विभागाने सांगितले. कृषी सहायक अधिकारी आरगे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पन्हाळा तालुक्यात सात ठिकाणी पाऊस मोजला जातो. त्या प्रत्येक ठिकाणी सहा दिवसांत झालेला पाऊस असा; पन्हाळा-१८६.९, वाडी रत्नागिरी-१३०.२, कोडोली-१०५.५, कळे-८०.७,पडळ-१०४.७, बाजारभोगाव-९८, कोतोली-९२.१ मि.मी.अशी तालुक्यात सरासरी ११३.९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान गुरुवारी रात्री गडावर झालेल्या मुसळधार पावसाने नेहरू उद्यान येथील दोन व धर्मकोठीसमोरील एक असे तीन जुने वृक्ष उन्मळून पडले. यामुळे गडावर कांही भागात वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार पावसामुळे कार्यालयीन कामकाजासाठी येणेऱ्या पक्षकारांनी पाठफिरवल्याने बहुतेक कार्यालयात शुकशुकाट होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT