कोल्हापूर

पोर्ले-दालमियात रोलर पुजन

CD

01644
पोर्ले तर्फ ठाणे : येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याच्या मिलरोलरचे पूजन करताना युनिट हेड एस रंगाप्रसाद, महावीर पाटील, संग्राम पाटील, अधिकारी व कर्मचारी.

‘दत्त-दालमिया’मध्ये
मिलरोलरचे पूजन
पोर्ले तर्फ ठाणे, ता. १ : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठीचे मिलरोलरपूजन युनिटहेड एस रंगाप्रसाद यांच्या हस्ते केले. या वेळी कारखान्यात विधीवत सत्यनारायण पूजा करून सर्व खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पूजा केली.
एस रंगाप्रसाद म्हणाले, ‘‘परिसरातील शेतकरी, वाहतूकदार, हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच गत गळीत हंगामात चांगले गाळप केले. तसेच पुढील गळीत हंगामातील गाळपाचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे.’’
या वेळी चिफ इंजिनिअर महावीर पाटील, सहायक शेती अधिकारी संग्राम पाटील, कणक सबई, सुभाष डोरा, आनंद कदम, राजेंद्र पाटील, मुकुंद गुळवणी, बबन रेपे, एच. आर. नीलेश पाटील, रामचंद्र ग्राफ, मणिकंडण, ग्यानेंद्र मिश्रा, प्रकाश पोवार, मोहसिन शेख, विलास शिंदे, एम. एम. पाटील, प्रकाश चौगुले, जोतिराम शेळके, मोहन उतरेकर आदींसह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--------
चौकट
उर्वरित एफआरपी रक्कम जमा
दरम्यान, कारखान्याने हंगाम २०२२-२९२३ मधील पहिली उचल ३१०० रूपये आदा केले आहे. हंगाम समाप्तीनंतर चालू हंगामातील साखर उताऱ्यावर बसत असलेली उर्वरित एफआरपी रक्कम प्रती टन ७४.४८ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहे, अशी माहिती युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT