02607
दत्त दालमिया कारखान्याला
विविध मागण्यांचे निवेदन
पोर्ले तर्फ ठाणे, ता. ३ ः येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन पन्हाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. निवेदन कारखान्याचे एचआर प्रमुख सुहास गुडाळे व मुख्य शेती अधिकारी संग्राम पाटील यांना रामराव चेचर, विक्रम पाटील, अजित पोवार यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, जयसिंगपूर ऊस परिषदेत मागणी केल्याप्रमाणे २०२३/२४ हंगामातील उसाचा अंतिम हप्ता २०० रुपये व चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला ३७०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्यात यावा, कार्यक्षेत्रातील ऊस लवकरात लवकर तोडावा व पूरबाधित ऊस पहिल्यांदा तोड करावी तर ऊसतोडणी मजूरांकडून होणारी आर्थिक मागणी बंद करण्याबाबत पावले उचलावीत, अशा आशयाचे निवेदन कारखान्याचे एचआर प्रमुख सुहास गुडाळे व मुख्य शेती अधिकारी संग्राम पाटील यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे रामराव चेचर, अजित पोवार, विक्रम पाटील, अण्णा मगदूम, उमेश शेलार, नारायण पाटील, धोंडीराम पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.