03103
काजू उत्पादनात ८० टक्के घट
भुदरगड तालुका ; गारपिटीचा परिणाम, भरपाईची मागणी
संजय खोचारे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव, ता. ९ ः भुदरगड तालुक्यातील काजू उत्पादनात घट झाल्यामुळे काजू फळबाग शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह दमदार वळीव पावसाने हजेरी लावली. काजू फळबागा गारांच्या माऱ्यामुळे झोडपून निघाल्या. मोठ्या प्रमाणात मोहर गळती झाली आहे. सलग ढगाळ वातावरणामुळे अगोदरच मोहर गळती झाली. पुन्हा गारपीट झाल्याने काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
भुदरगड तालुक्यातील कडगाव, पाटगाव परिसरात मोठ्या प्रमाणात काजू फळबाग नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे भरपाईची मागणी केली आहे. फिरते काजू व्यापारी सध्या गावोगावी फिरून काजू बी खरेदी करत आहेत. उत्पादनच नसल्याने काजू विक्री ऐंशी टक्के कमी झाली आहे. काजू फळबाग उत्पादक दरवर्षी एप्रिल महिन्यात बी विक्री करून अर्थार्जन करतात. यावर्षी मात्र फळबाग उत्पादकांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे.
चौकट
नुकसानग्रस्त गावे
कडगाव, वेंगरुळ, वेसर्डे, मठगाव, फये, केळेवाडी, मुरुक्टे, मानवळे, भांडीबांबर ,दिंडेवाडी, शेळोली, यरंडपे, खेडगे, दोनवडे.
चौकट -
दरवर्षीपेक्षा यंदा काजू उत्पादनात मोठी घट झाली आहे. केवळ पावभाग उत्पन्नावर समाधान मानावे लागत आहे. काजू बी विक्रीनंतर शेतकरी पावसाळी हंगामातील बाजारहाट करतात. यावर्षी मात्र काजूचे म्हणावे तसे उत्पन्न नाही.
- शिवाजी बेलेकर, काजू फळबाग उत्पादक, मुरुक्टे
चौकट -
भुदरगड तालुक्यातील काजू उत्पादनात घट झाली आहे. काजू गरास चांगली मागणी असली तरी शेतकरी बी विक्री करताना उत्पादन घटल्याचे सांगत आहेत. दरवर्षी क्विंटलने बी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा किलोमध्ये विक्री केली. काजूगर उत्पादक कारखानदारांना मागणीप्रमाणे काजू बी उपलब्ध होत नाही. काजूगर निर्मिती संथपणे होत आहे.
- शिवाजी लुगडे, काजूगर उत्पादक, खानापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.