कोल्हापूर

आंबुताई कुंभार यांचा सन्मान

CD

00274
आंबुताई कुंभार यांचा सन्मान
रांगोळी, ता. २७ ः येथील सर्वसामान्य कुटुंबातील आंबुताई कुंभार यांना क्रांतिरत्न सोशल फौंडेशनतर्फे राज्यस्तरीय आदर्श माता २०२३ पुरस्काराने सन्मानित केले. संस्थेचे संस्थापक उत्तम हुजरे व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण केले.
कोरोची येथील क्रांतिरत्न सोशल फौंडेशनतर्फे प्रत्येकवर्षी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आज समाजामध्ये आदर्श शिक्षक, आदर्श व्यावसायिक, आदर्श समाजसेवक यांचा गौरव होतो. या गौरवमूर्तींच्या मागे खंबीरपणे उभी असणारी स्त्री म्हणजे आई. अशा स्त्रियांना आदर्श माता पुरस्कार दिले. यासाठी रांगोळी येथील आंबुताई कुंभार यांची निवड केली होती. आंबुताई यांनी कुंभारकाम करीत अत्यंत बिकट परिस्थितीत मुलांना शिक्षण दिले आहे. त्यांचा मुलगा मच्छिंद्र राष्ट्रीयस्तरावर क्रिकेट खेळत आहे. सध्या तो मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. थोरली नात सायली आज इलेक्ट्रॅानिक इंजिनिअरींगमध्ये युनिव्हर्सिटी गोल्डमेडलिस्ट आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. दुसरी नात मानसी हिने आय.टी. पदवी पूर्ण केली आहे. ती सध्या टाटा कंपनीत नोकरीस आहे. या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी माऊली म्हणजेच आंबुताई कुंभार यांना राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT