कोल्हापूर

सुधारित बातमी.... भारुड-फुगडी, पखवाज वादन आणि पावलांच्या खेळांनी मेतकेत भाविक मंत्रमुग्ध

CD

2727
मेतके ः माउलींच्या फुगड्या, भारुड-फुगडी आणि पावलांचे खेळ सादर करताना ज्ञानोबा-तुकोबा आध्यात्मिक संस्थेचे विद्यार्थी. (छायाचित्र : साताप्पा चव्हाण, बनिक्रे)
......
भारुड, पखवाज वादनात
मेतकेत भाविक मंत्रमुग्ध

भक्तनिवास लोकार्पणामुळे बाळूमामा मंदिर परिसरात आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ३० : मानवी फूल, रथ, माउलींच्या फुगड्या, अंधश्रद्धेवर प्रहार करणारी भारुड-फुगडी, पखवाज वादन आणि पावलांच्या खेळांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. मेतके (ता. कागल) येथील सद्‍गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने झालेल्या भक्तनिवास आणि अन्नछत्र लोकार्पण सोहळ्यानिमित्त येथील बाळूमामा मंदिर परिसर आनंदोत्सवात न्हाऊन निघाला
ज्ञानोबा-तुकोबा आध्यात्मिक संस्थेच्या ७० मुलांनी यात सहभाग घेतला. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज प्रमुख उपस्थित होते.
मानवी रथ आणि फूल, माउलींच्या फुगड्या वारकरी संप्रदायाचे भजन, श्लोक, पंचपदी ३२ पावलांचे प्रकार दाखविणारे खेळ, अभंग आणि टाळ-मृदंगाचा गजर यामध्ये भाविक तल्लीन झाले. पंचपदी आणि ज्ञानोबा तुकोबाच्या गजराने मेतके आणि परिसर दुमदुमला. ओमकार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक संस्थेच्या मुलांनी नरबळी, जीवित हानी, पक्षीबळी ही अंधश्रद्धा कशी आहे, हे दाखविणारी भारुड- फुगडी आणि लघुनाटिका सादर केली.
सायंकाळी मंदिरात पखवाज वादनाचा नाद घुमला. यामध्ये कृष्णात साळुंखे, महेंद्र साळुंखे, यश खडके, ज्ञानेश्वर अंबिल, यश मेस्त्री, पृथ्वीराज कदम, हरिदास घेवडे यांनी सहभाग घेतला. ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष राजेंद्र पाटील, विश्वस्त बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, बळिराम मगर, पद्मजा तिवले, देवाप्पा पुजारी आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT