कोल्हापूर

पालकमंत्री केसरकर यांची दत्त कारखान्यास सदिच्छा भेट

CD

72288
शिरोळ ः पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत करताना गणपतराव पाटील व मान्यवर.
----------
पालकमंत्री केसरकर यांची
दत्त कारखान्याला सदिच्छा भेट
शिरोळ, ता. १ ः पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सदिच्छा भेट दिली. या वेळी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मंत्री केसरकर यांनी, श्री दत्त कारखान्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा योजनेची माहिती घेतली. तसेच, ऊस विकास योजनेंतर्गत कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती घेतली.
कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सध्या कारखाना कार्यक्षेत्रात सात हजार एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून, साडेतीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादन घेणे सुरू झाल्याचे सांगितले. कारखान्याने सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या तंत्रज्ञानामुळे या भागातील शेतकरी १०० टनांवर उसाचे उत्पादन घेत असल्याची माहिती दिली.
कारखान्याचे संचालक दरगू गावडे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, अभिजित जगदाळे, दीपक गायकवाड (कुरुंदवाड), सागर धनवडे, नगरसेवक प्रकाश गावडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT