शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे
शिरोळमध्ये दुर्गामाता दौड
सकाल वृत्तसेवा
शिरोळ, ता. ४ ः नवरात्रोत्सवाच्या काळात येथील श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने शिरोळ तालुक्यातील प्रत्येक शहरात व गावात दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. दौडच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा जपण्याचा संकल्प करण्यात आला आहे
शुक्रवारी येथील अनुसूचित जमातीच्या कोळी बांधवांना मान देऊन तरुणांना स्फूर्ती व प्रेरणा देण्याचे अलौकिक कार्य केले. तसेच या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा जपण्याचा संकल्पही केला.
दौडमध्ये परिसरातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच हजारो तरुण-तरुणींचा सहभाग आहे. पहाटेच्या वेळी निघणाऱ्या दौडमध्ये जय भवानी जय शिवाजी, अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, अशा घोषणा देत छत्रपती शिवरायांचा प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हणत विविध स्फूर्ती गीत गात शहरातील प्रत्येक भागात एक दिवस श्री दुर्गामाता दौड जात आहे.
शहरातील ब्राह्मण, कोळी, लिंगायत, जैन, नाभिक, चर्मकार, कोरवी, बौद्ध व मातंग या समाजास एक एक दिवस शिवतीर्थ पूजनाचा मान देण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आणि शिरोळ तालुकाध्यक्ष प्रवीण चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील प्रत्येक शहरात आणि गावात श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक शहर आणि गावात शिवमय व भगवे वातावरण निर्माण होऊन श्री दुर्गा देवीचा गजर होत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.