कपॅसिटर्समुळे वर्षाला बिलात
पाच लाखांची होणार बचत
पुजारी यादव ः शिरोळ नगरपरिषद नळ योजेना
शिरोळ, ता. २० ः शिरोळ नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या घालवाड येथील जॅकवेल पंपग्रहामध्ये, पावर फॅक्टर सुधारण्यासाठी पसायदान कंपनीचे कपॅसिटर्स बसवले. वार्षिक देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही कंपनीने घेतली आहे. यामुळे वापरण्यात येणाऱ्या वीज बिलात महिन्याला सुमारे ४० हजारांची व वार्षिक सुमारे पाच लाख रुपयांची बचत होणार आहे, अशी माहिती संजीव पुजारी व उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी दिली.
घालवाड येथून कृष्णा नदीतून, शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना कार्यरत आहे. या ठिकाणी जॅकवेलच्या पंपग्रहांत, पाणी उपसा करतात विद्युत मोटारी बसवल्या आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्युत उपसा मोटारीत बिघाड होऊन, नगरपरिषदेला आर्थिक भुर्दंड बसत होता.
उद्योगपती पुजारी यांनी पसायदान इलेक्ट्रिकल्स या कंपनीची स्थापना शिरोळ येथे केली आहे. या कंपनीने तयार केलेल्या कपॅसिटरमुळे विजेची बचत होऊन वीज बिल कमी येत आहे.पसायदान इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या माध्यमातून पावर फॅक्टर इम्प्रूमेंटची कामे केली जातात. यातून वीज बचत होऊन, बिल कमी होते. ही कामे सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थापनामध्ये, मोठ्या खाजगी कंपन्या, साखर कारखाने, नगरपालिका,महापालिका, नेव्ही, एअर फोर्स, ट्रेनिंग सेंटर यासह देशातील विविध ठिकाणी केली जातात. फर्नेस व स्टील प्लांटमध्ये वापरण्यात येणारे हायटेक, असे मीडियम फ्रिक्वेन्सी वॉटर कोल्ड कॅपॅसिटरची निर्मितीही कंपनीने सुरू केली आहे. कंपनीने शिरोळ नगरपरिषदेला विनामूल्य कपॅसिटर देऊन योगदान दिले, अशी माहिती यादव यांनी दिली.
कोट
शिरोळ गावच्या विकासात खारीचा वाटा असावा या हेतूने पसायदान इलेक्ट्रिकल्स कंपनीने, कॅपॅसिटर विनामूल्य बसवला आहे.
-संजीव पुजारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.