01495
...
पतौडी खाणीत पोहण्यास
गेलेला तरुण बुडाला
दिवसभर शोधकार्यः आज स्कूबा डायव्हिंग पथकाची मदत घेणार
साने गुरुजी वसाहत ता.२१ ः रंकाळा परिसरातील पतौडी खाणीत पोहण्यास गेलेला आकाश गणेश घोरपडे (वय २५, रा. गंजीमाळ) हा तरुण पाण्यात बुडाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास तो मित्रासोबत आला होता. पोहताना दम लागून तो बुडाला. याची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर शोध घेऊनही तो मिळून न आल्याने सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. बुधवारी स्कूबा डायव्हिंग पथकाच्या मदतीने पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याचे अग्निशमनच्या वतीने सांगण्यात आले.
आकाश घोरपडे त्याच्या मित्रासोबत पोहण्यास आला होता. बराच वेळ पोहल्यानंतर त्याला काहीशी धाप लागली. अचानक तो नजरेस पडण्याचा बंद झाल्याने त्याच्या मित्राने आरडाओरडा केला. अकरा वाजून २० मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बोटीच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान बोटीवरील इंजिन बिघडून मोटर बंद पडली. काही काळ शोधमोहीम थांबवून नवीन मोटर आणावी लागली. पाण्यात शोध घेण्यासाठी उदय निंबाळकर हेदेखील उतरले होते, पण सायंकाळी साडेपाचनंतर अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. आकाशला दोन भाऊ आहेत. आई-वडलांचे छत्र हरपल्याने तिघे भाऊ एकमेकांना साथ देतात. आकाशचा मोठा भाऊ कॅटरिंगचा व्यवसाय करतो. त्याच्यासोबत आकाश जात होता, तर त्याचा लहान भाऊ वाशी नाका परिसरात चायनीज पदार्थाची गाडी चालवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.