कोल्हापूर

तुळजाभवानी आपटे नगर प्रभागातील बंद पथदिवे त्वरित बसवा अन्यथा आंदोलन : राजू दिंडोर्ले

CD

आपटेकर प्रभागात
पथदिवे बंदावस्थेत
साने गुरुजी वसाहत ः तुळजाभवानी आपटेकर प्रभागातील काही भागांमध्ये पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्री ज्येष्ठांना व महिलांना वाट शोधताना त्रास होत आहे. रात्री महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू घेऊन चोरटे पोबारा करीत आहेत. तसेच छेडाछेडीचे प्रकारही होत आहेत. तसेच तळीरामांचाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागात पोलिसांची गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे.
या प्रभागामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे रात्री रस्त्यावरून मार्गक्रमण करताना भीती वाटते. प्रभागामध्ये भटक्या कुत्र्यांचाही वावरही खूप वाढला आहे. त्यामुळे अंधारात कुत्र्यांचीही भीती नागरिकांना वाटत आहे. याबाबत माजी नगरसेवक व मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी संबंधित विभागात अनेक वेळा तोंडी सूचना देऊनही संबंधित विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे राजू दिंडोर्ले यांनी आज लेखी निवेदन अतिरिक्त आयुक्त यांना दिले. दोन दिवसांत पथदिवे बसवण्याबाबत कार्यवाही नाही झाली, तर आंदोलन करण्याचा इशारा राजू दिंडोर्ले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT