कोल्हापूर

कोपार्डेतील घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

CD

कोपार्डेतील घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी
तुरुकवाडी : कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक यांना याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, कोपार्डे येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप भावांचा अतिउच्च विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला. सदरच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. तरुण मुलांच्या मृत्युमुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक धक्का बसला. यात त्याच्या मातोश्रीनेही प्राण सोडले. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदापणामुळे निष्पाप जीवांचा बळी जात असून संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पडलेल्या वाहिन्यांची वेळीच दुरुस्ती होत नाही. त्यामुळे शासनाने अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व संबंधित कुंटुंबास ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी. याचा दखल न घेतलेस तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT