कोल्हापूर

(साईट स्टोरी) कमावत्या मुलाचा आधार हरवल्याने कुटुंब निराधार

CD

कुटुंबीयांचा आधार हरपला ...

उजळाईवाडी, ता. १२ः उचगाव पूर्व येथील शांतिनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या आप्पाजी नामदेव पवार याचा अवघ्या १९ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाल्याने भटक्या फासेपारधी समाजातील गरीब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वडील नामदेव आनंदा पवार, आई लक्ष्मी, मोठा भाऊ रवी व आप्पाजीचे सर्व कुटुंबीय रस्ते काम व इतर मिळेल ते काम करीत कुटुंबीयाची गुजराण करतात. आप्पाजी लहानपणापासूनच कष्टाळू होता. तो कुटुंबात सर्वांना सर्वच कामात मदत करत होता. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अकरावीपर्यंत शिकलेल्या आप्पाजीने शिक्षण अर्धवट सोडून मित्रांसमवेत कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. छोटी -मोठी कॅटरिंगची कामे करू लागल्याने कुटुंबीयांना आप्पाजीचा मोठा आधार मिळाला. कारण पवार कुटुंबीय रोजंदारीवर काम करीत असल्यामुळे मिळेल तेव्हा पडेल ते काम करीत असत. या कामांमध्ये अनियमितता असल्याने उत्पन्नही यथातथाच आहे. आप्पाजीने सुरू केलेल्या कॅटरिंग व्यवसायामुळे कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या; परंतु कळंबा येथे तुटलेल्या तारेच्या स्पर्शाने शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले.
...

फोटो
१) आप्पाजी पवार यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीचा फोटो.

२) शांतिनगर (उचगाव पूर्व) येथे आप्पाजी पवार या युवकाच्या मृत्यूमुळे आप्पाजीचे वडील, आई, भाऊ, बहीण हे सर्व नातलग शोक सागरात बुडाले आहेत.
03320, UJL23B03321

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT