कोल्हापूर

जिल्ह्यात ४९७ शाळांमध्ये संपादणूक सर्वेक्षण पूर्ण

CD

जिल्ह्यात ४९७ शाळांमध्ये
संपादणूक सर्वेक्षण पूर्ण
अकरा हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
सुनील स. पाटील : सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. २८ : राज्यातील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गाचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण पूर्ण झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ४९७ शाळांमधून ११ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. एक महिन्यानंतर या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता किती आहे व अध्ययन स्थिती काय आहे हे समजणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांच्यातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हास्तरावर डाएटवर याची जबाबदारी होती. जिल्हा परिषद, महापालिका व खासगी अनुदानित शाळांपैकी जिल्ह्यातील ४९७ शाळांमधून एकाच वेळी सकाळच्या सत्रात हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात तिसरीच्या १५९ वर्गातील तीन हजार ३५६, पाचवीच्या १६३ शाळातील तीन हजार ५३० व आठवीच्या १७५ शाळांमधील चार हजार ६२६ अशा एकूण ११ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या पुणे कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. सर्वेक्षणाचा शाळानिहाय किंवा विदयार्थीनिहाय निकाल जाहीर होणार नाही.
इयत्ता तिसरी व पाचवी वर्गासाठी मराठी भाषेचे वीस, गणिताचे २५ असे ४५ प्रश्‍न होते. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे २५ व गणिताचे ३५ असे ६० प्रश्न होते. या सर्वेक्षणासाठी डाएटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या वैशाली पाटील व अधिव्याख्यात्या सरिता कुदळे यांनी जिल्हास्तरीय समन्वयकाचे काम पाहिले.
------------
कोट
अतिशय चांगल्या पध्दतीने सर्वेक्षण झाले आहे. जिल्हा, तालुका समन्वयकांनी योग्य जबाबदारी पार पाडली. या सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर राहिल याची आम्हाला खात्री आहे. तरीही काही त्रुटी आढळून आल्यावर त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करू
- आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT