कोल्हापूर

नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा: डॉ. विनयरावजी कोरे कोरे अभियांत्रिकीत प्लेसमेंट डे चे यशस्वी आयोजन ------

CD

03668
नवनवीन तंत्रज्ञान
आत्मसात करा : डॉ. विनय कोरे
कोरे अभियांत्रिकीत प्लेसमेंट डे

वारणानगर, ता. ४ : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चार्ट जीपीटीसारखे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारा, असे मत वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी येथे व्यक्त केले. येथे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयात ‘प्लेसमेंट डे’निमित्त २०२२-२३ मध्ये विविध कंपन्यांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ. कोरे म्हणाले, ‘नोकरी मिळवून तुम्ही आई-वडिलांचा गौरव करणार आहात. जगाच्या कानाकोपऱ्यात वारणेचा विद्यार्थी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा.’ प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम म्हणाल्या, ‘प्लेसमेंट डे तरुण अभियंत्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. यशाची शिखरे विद्यार्थ्यांनी गाठावीत.’ प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी यशाची आठ सूत्रे सांगितली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांनी, यंदा ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाल्याचे सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी सुरू केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व देश विदेशात विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT