कोल्हापूर

कोरे अभियांत्रिकी येथे "सेन्टर ऑफ एक्ससललेन्स इन इलेक्ट्रिक वेहिकल्स" केंद्राचे उद्घाटन

CD

05378

इलेक्ट्रिक वेहिकल्स केंद्राचे
कोरे अभियांत्रिकीत उद्घाटन

वारणानगर, ता. १२ : ‘ई-मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहनांमधील उत्कृष्टता केंद्र अत्याधुनिक सुविधा प्रदान करेल. जिथे विद्यार्थी इलेक्ट्रिक सायकल, बाईक विकसित करू शकतील आणि इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील. जागतिक स्पर्धेत, विशेषतः शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असेल. वाढत्या ईव्ही उद्योगासह विविध क्षेत्रांमध्ये असंख्य करिअर संधी उदयास येत असल्याची माहिती वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी दिली.
येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक व्हेईकलमधील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन डॉ. कारजिन्नी यांच्या हस्ते झाले. प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. कारजिन्नी म्हणाले, ‘‘या अभ्यासक्रमासाठी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रोनिक्स विभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली आहेत. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह उद्योगात नोकरी मिळण्यास मदत होईल. प्रमाणित कार्यक्रमात ६ विषय समाविष्ट आहेत जे सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आहेत.’’ ही प्रयोगशाळा तयार करण्यासाठी, डॉ. प्रवीण जी. ढवळे, आणि सहकाऱ्यांचे योगदान लाभले. प्रा. मल्लनगौडा एन. आणि सहकारी, डॉ. धनराज पाटील, प्रा. प्रवीण देशमुख, प्रा. विशाल सनदे, एन. बी. जाधव यांचे सहकार्य मिळाले.
उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. एम. पिसे, मुरली अय्यर, संजीव राजोरिया, डॉ. प्रवीण जी. ढवळे, प्रा. पी. आर. पाटील, वारणा विद्यापीठाचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT