कोल्हापूर

अनाथ मुलांचा संगोपणासाठी सुनिलकुमार लवटे यांचे संपूर्ण आयुष्य खर्च--- आमदार डॉ विनय कोरे

CD

06635

अनाथांसाठी लवटे यांचे आयुष्य खर्ची
आमदार डॉ. विनय कोरे ः विलासराव कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ

वारणानगर, ता. ६ ः अनाथ मुलांच्या संगोपनासाठी आयुष्य खर्च करणारे सुनीलकुमार लवटे यांना सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातोय; याचा सार्थ अभिमान आहे, ’’ असे मत आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे व्यक्त केले.
स्व. विलासराव कोरे यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणार्थ सत्कार्य संवर्धक मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने व तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना यांच्या सहकार्याने वारणा साहित्य पुरस्कार प्रदान, ३३ ग्रंथालयांना ग्रंथसंच भेट, वक्तृत्व व सामान्यज्ञान स्पर्धेत यशस्वीतांना बक्षिस अशा डॉ. कोरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभागप्रमुख डॉ. बी. एम. हिर्डेकर होते.
सुशीलकुमार लवटे म्हणाले, ‘‘असंख्य अनाथ मुलांच्या आशा, स्वप्नं आणि संघर्षांचा सन्मान आहे,
जेव्हा या प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा एकच ध्येय मनात होतं—या मुलांना केवळ आश्रय नव्हे, तर प्रेम, शिक्षण आणि स्वाभिमानाने जगण्याची संधी द्यायची. आई-वडिलांची माया न मिळालेल्या या मुलांच्या डोळ्यांमध्ये स्वप्नं असतात, पण त्यांना आधाराची गरज असते. त्या आधाराचा एक छोटासा भाग बनता आलं, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. डॉ.हिर्डेकर यांनी वारणा समूहाच्या उत्तुंग कार्याचा आढावा घेऊन सुनीलकुमार लवटे सरांच्या जीवन चरित्रत्राचे संक्षिप्त वर्णन केले. वारणा सत्कार्य मंडळाचे मानद सचिव
विजय पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी जंगम, माधव गुळवणी, के. एम . वाले, वारणा समूहातील संस्थांचे संचालक उपस्थित होते.
ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर सुनीलकुमार लवटे यांना सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे जीवनगौरव पुरस्कार, ''ब्युटी ऑफ लाईफ'' अशा नेगी, पुणे यांना स्व. तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार, जामिनावर सुटलेला काळा घोडा'' लिखीत धनाजी धोंडीराम घोरपडे, (बहादूरवाडी ता.वाळवा) यांना स्व. सावित्रीअक्का कोरे काव्य पुरस्कार, ''घुंगरू'' प्रा. अरविंद मानकर,( सरवडे, राधानगरी) यांना स्व. शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार,''काळीजफूल''- वर्षा किडे-कुळकर्णी, (नागपूर) यांना स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार देऊन गौरविले. प्रा. पी. बी. बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime Case : एरंडेच्या कार्यालयात प्राण्यांचे अवयव; पेनड्राइव्हमध्ये सात महिलांचे 120 व्हिडिओ; महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Nanded News: जल जीवनची ६० टक्केच कामे पूर्ण; अनेक गावांवर पाणीटंचाईचे मळभ; आडात आहे, पण पोहऱ्यात येईना

Latur News: दापका राजा ते जळकोट रस्त्याची दुरवस्था; दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग; वाहनधारकांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Orion Spacecraft Mission: अपोलो १३ चा विक्रम मोडला, चांदोमामाच्या मागे लपले ओरायन

SCROLL FOR NEXT