कोल्हापूर

पेरणीपूर्व मशागतीला आवळी परिसरात वेग

CD

3355
...............

पेरणीपूर्व मशागतीला
आवळी परिसरात वेग

आवळी बुदुक, ता. १६ : पावसाळी पिकांसाठी पेरणी करण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आवळीसह परिसरात वेग आला आहे. आठवड्याभरावर आलेल्या रोहिणी नक्षत्रात भात पिकासाठी धूळवाफ पेरणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची शेतीकामांची सर्वत्र मोठी धांदल उडाली आहे.
राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागात चक्रेश्वरवाडी, बारडवाडी, पिंपळवाडी, आवळी बुद्रुक, आमजाई व्हरवडे, सिरसे, भोपळवाडी आदी गावांतील शिवारात पावसाळी पेरणीपूर्व शेतीकामांनी गती घेतली आहे. शिवारासह प्रामुख्याने जिरायती क्षेत्रातील माळरानावरील शेतीत सध्या पॉवर टिलर किंवा मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटीची कामे करताना शेतकरी दिसत आहेत. काही तुरळक ठिकाणी बैलांच्या औतानेही शेतात नांगरटी केली जाताना दिसत आहेत. किंबहुना ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील नांगरटीची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे शेतीला बांध घालणे, ढेकळ फोडणे, धसकटे, पालापाचोळा पेटवणे आदी कामे सुरू आहेत. मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे शाळकरी मुलेही कुटुंबीयांना शेतीकामाला हातभार लावताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT