कोल्हापूर

सुधारीत वार्तापत्र

CD

राधानगरी
- राजू पाटील

राधानगरीत पडला भुदरगडचा ‘प्रकाश’
राशिवडे बुद्रुक : थेट जनतेशी संपर्क, विकासकामांचा धडाका, पक्षविरहीत काम यामुळेच राधानगरी मतदारसंघ पुन्हा ‘प्रकाशमय’ झाला. मतदारसंघातील नेते विरुद्ध सामान्य जनता अशी यावेळी लढत झाली. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या बाजूच्या नेत्यांच्या ‘करंट''पेक्षा'' जनता जनार्दनाने जोराचा ‘अंडर करंट’ देत प्रकाश आबिटकर यांना पसंती दिली. बंडखोर ए. वाय. पाटील मागे राहिले. हा विजय स्थानिक नेत्यांना चपराक लावणारा ठरला.
सलग तिसऱ्या वेळेला येथे आमदार होता येत नाही, हे आबिटकर यांनी खोडून काढले. आबिटकर यांचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांनी चंग बांधला होता. उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघ सतेज पाटील यांच्या ओट्यात टाकला. मात्र, प्रचारात विकासाच्या मुद्द्याऐवजी आबिटकरांवर एकतर्फी टीका करण्याचा सपाटा लावला. दुसरीकडे आबिटकर हे विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर गेले. विकास कामांना आणि जनतेला माणूस म्हणून आमदार आबिटकर यांना साथ केली. ‘साहेब’ या बिरुदावलीत न अडकता लहान-थोरांच्या तोंडचा ''प्रकाश आबिटकर'' प्रत्येकाला हा घरचाच वाटला. बहिणींनी ओवाळणी टाकली आणि युवकांनी साथ केली.
या मतदारसंघात बंड केले की यशस्वी ठरते, या विश्वासावर ए. वाय. पाटील होते. मात्र, ते अयशस्वी ठरले. के. पी. पाटील यांना निवडून आणण्यासाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. त्या विरोधात जनतेतून अंडरकरंट तयार झाला. आजरा शहर हे अपवाद ठरले. तिथे भाजपचा अजेंडा मुस्लिम मतांच्या नाराजीचे कारण ठरल्याचे पुढे आले आहे. ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, डॉ. जालंदर पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी साथ केली. जनतेच्या हट्टापुढे कुणाचे काहीही चालले नाही. निकालानंतर गावागावांत झालेला जल्लोष हा सामान्य कार्यकर्त्यांचा होता. कुठेही नेते सहभागी झालेले दिसून आले नाहीत. सर्वसामान्याने निवडणूक हातात घेतली की काय होते, त्याचे हे उदाहरण ठरले.

घडले काय?
१) प्रकाश आबिटकर यांना बहिणींकडून मतांची ओवाळणी
२) स्थानिक नेत्यांवर टाकलेला विश्वास के.पीं.ना नडला
३) गोरगरीब जनतेने हातात घेतलेली निवडणूक
४) आजरा शहर आणि चार-पाच गावांमध्येच के. पी. पुढे
५) अपक्ष ए. वाय. पाटील यांना मतदारांनी नाकारले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला पाहिजे - आनंद दुबे

SCROLL FOR NEXT