कोल्हापूर

राशिवडेतील शिबिरात ५८ जणांचे रक्तदान

CD

6082
राशिवडे : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी संजीवनी पाटील, विनय पाटील, सागर धुंदरे आदी.
.......
राशिवडेतील शिबिरात ५८ जणांचे रक्तदान
राशिवडे बुद्रुक : येथील धनगर समाजाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आज साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच संजीवनी पाटील यांच्या हस्ते झाले. यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ५८ जणांनी रक्तदान केले. अशोक जोंग व सेवानिवृत्त प्रा. अनिल कावणेकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन परिचय करून दिला. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, माजी सरपंच सागर धुंदरे व कृष्णात पोवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. सुभाष जाधव, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सम्राटसिंह पाटील, संतोष कातिवले, हरीश मगदूम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, राशिवडे धनगर समाज व बिरदेव मंदिर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. दत्तात्रय जोंग यांनी स्वागत केले. अशोक जोंग यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय रंगराव जोंग यांनी आभार मानले.

शेंडूरमध्ये २१ जणांचे रक्तदान
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २१ जणांनी
रक्तदान केले. हालसिद्धनाथ तरुण मंडळ शेंडूर व धनगर समाज यांच्यावतीने हे शिबिर आयोजित केले होते. वैभवी लक्ष्मी ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलित केले. मान्यवरांच्या हस्ते होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games: नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ग्लासगोमध्ये डंका ऐतिहासिक रौप्य पदक जिंकत उंचावली तिरंग्याची शान

Mahalaxmi Express Fire : कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग; रेल्वे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना

Latest Live Updates Marathi : महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीस प्राप्तिकराची अट, झिरो आयटीआर धारकाला दिलासा

विदर्भात आज-उद्या मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT