

Nashik’s Sarvesh Kushare Win Silver Medal | Commonwealth Games
Sakal
Nashik’s Sarvesh Kushare Scripts History at Commonwealth Games 2026: ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ सुरू असून या स्पर्धेत भारतीय खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. भारतीय वेटलिफ्टर्सने या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता भारताचे खेळाडू ऍथलेटिक्समध्येही चमकत आहेत.
या स्पर्धेत सोमवारी नाशिकचा ३१ वर्षीय ऍथलिट सर्वेश कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.