To track the history of stray dogs chips will be placed on their feet 
कोल्हापूर

कोल्हापुरातल्या 'या' कुत्र्यांच्या शेपटीच्या मागे बसविली जाणार चीप ! का ते वाचा...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नजरेस पडला की ते पाळीव कुत्रे आहे असा कोल्हापुरात समज आहे. खासगी मालकीच्या कुत्र्यांच्या गळ्यातील पट्टा आता भटक्‍या कुत्र्यांच्या शेपटीजवळ लवकरच दिसणार आहे. या कुत्र्यांची हिस्टरी समजण्यासाठी त्यांच्या पायात चीप बसविली जाणार आहे.

पशसवंर्धन विभाग, महापालिका आरोग्य विभागाची यासंबंधी बैठक झाली. कुत्र्यांच्या गळ्यात बेल्ट बसविण्यासाठी पालिकेने मुंबई, पुण्यातील ठेकेदारांकडून कोटेशन मागविली होती. मात्र लॉकडाऊनमुळे कोटेशन मिळू शकलेले नाही. शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. प्रामूख्याने कसबा बावडा येथील झूम प्रकल्पावर कचरा टाकला जातो तेथे कुत्र्यांचा उपद्रव अधिक आहे. गल्लीबोळ, उद्याने, उपनगरातील रस्त्यांवर रात्री अपरात्री कुत्री भटकत असतात. एखाद्या भागातून तक्रार आल्यानंतर महापालिकेची डॉग व्हॅन या कुत्र्याला पकडून नेते. नंतर कुत्रे आहे त्या ठिकाणी सोडले जाते. भटक्‍याची कुत्र्यांची नेमकी किती आहे हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यांच्या गळ्यात बेल्ट घालून हेच ते भटके कुत्रे अशी ओळख होणार आहे.

कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांना रेबीजची प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. प्रत्येक कुत्र्याच्या शेपटीच्या मागे चीप बसविली जाणार आहे. त्या चीपवर संबंधित कुत्र्याचा नंबर असेल. नंबर स्कॅन केल्यानंतर कुत्र्याचे लसीकरण कधी झाले. शस्त्रक्रिया कधी झाली याची माहिती मिळणार आहे.
कोल्हापुरात खासगी मालकीच्या कुत्र्यांना पट्टा घालण्याची परंपरा आहे. गळ्यात पट्टा दिसल्यानंतर ते खासगी मालकीचे आहे हे ओळखले जाते. मात्र रस्त्यावरील कुत्र्यांनाही गळ्यात पट्टा अडकविण्याचा मान मिळणार आहे.
 

कुत्र्यांच्या गळ्यात बेल्ट आणि चिप नजीकच्या काळात बसविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुत्र्याची हिस्टरी समजू शकेल. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बेल्ट देण्याची तयारी दाखविली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कोटेशन मिळविण्यात अडचणी आहेत. नंतर प्रत्येक कुत्र्याच्या गळ्यात बेल्ट बसेल. - विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT