कोल्हापूर

दुर्घटना टळली; अरुंद रस्त्यावरून ट्रक घसरला, राधानगरी मार्गावरील घटना

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

साईनाथ पाटील

हळदी : राधानगरी राज्यमार्गावर (radhanagari road) हळदी (ता.करवीर) व कोथळी दरम्यान गोव्याहून (goa) कोल्हापूरमार्गे दिल्लीला (kolahpur to delhi) जाणारा मालवाहू ट्रक अरुंद रस्त्यावरून खाली घसरला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी रात्री बाराच्या सुमारास मालवाहू ट्रक (एन.एल.०१ ए.बी.९२४८) गोव्याहून फोंडाघाट व पुढे कोल्हापूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी निघाला होता. राधानगरी राज्य मार्गावर कोल्हापूर ते परीते दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी जवळपास सहा महिन्यापासून रस्त्याच्या दुतर्फा बाजूपट्टीची खुदाई केली आहे. दरम्यान अरुंद रस्त्यातून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जागा देताना संबंधित ट्रक रस्त्यावरून बाजूला खोदलेल्या बाजूपट्टीवर घसरला.चालकाने ताबा मिळवल्यामुळे ट्रक पलटी होण्यापासून बचावला.परिणामी जीवितहानी टळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली असली तरी या मार्गावरील वाहतुकीचा धोका टळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

Maharashtra Kesari : कुंडलचे मैदाना हिंदकेसरी गोलियाने मारले, ४ महाराष्ट्र केसरी पराभूत; महिला कुस्तीतही उत्तर भारतियांचा डंका

Aurangabad Crime: ‘इन्स्टाग्रामवर फेमस होण्यासाठी व्हिडिओ का टाकतेस?’; छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयावर चाकूने हल्ला

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

SCROLL FOR NEXT