ttempt of child marriage in Lakshatirtha Crime against four including the groom 
कोल्हापूर

बाल संरक्षण कक्ष पोलिसांची सतर्कता : कोल्हापूरातील बालविवाहाचा प्रयत्न झाला उध्वस्त ; नियोजित वरासह चौघांवर गुन्हा..

राजेश मोरे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे आज बालविवाह करण्याचा प्रयत्न सुरू होता जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी तो हाणून पाडला याप्रकरणी नियोजित वरासह आई-वडील अशा चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला.गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे राहुल राजू नाथ गोसावी 24 राजू अशोक नाथ गोसावी वय 42 मनीषा राजू नाथ गोसावी व 36 तिघे राहणार इस्लामपूर वाळवा आणि रेखा गोसावी राहणार लक्षतीर्थ वसाहत अशी आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती... 

आज दुपारी लक्षतीर्थ वसाहत येथील एका मंदिराच्या हॉलमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असल्याची माहिती चाईल्ड लाईन च्या सदस्यांना समजली त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधला पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या मदतीने या ओपन हॉलमध्ये छापा टाकला पोलिसांना पाहून वधू-वराकडील मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली चौकशीत नियोजित वधू ही अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली पोलिसांनी वधू-वरांच्या सह वराड मंडळीना थेट लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले याठिकाणी नियोजित वर राहुल गोसावी त्याचे वडील आई सह चौघांवर गुन्हा दाखल केला अशा पद्धतीने बालविवाह रोखण्याचा हा शहरातील गेल्या अनेक वर्षांतील पहिलीच घटना घडली.

बाल संरक्षण कक्ष पोलिसांची सतर्कता​

प्राथमिक चौकशीत नियोजित वर राहुल हा खेळणी विक्रीचा व्यवसाय करतो त्याने कर्नाटक भागातील बेडकिहाळ परिसरात नियोजित वधूला दोन वर्षांपूर्वी जत्रेत पाहिले त्यानंतर त्याने तिच्याशीच लग्न करण्याचा अट्टाहास घरच्यांकडे धरला गेल्या दीड महिन्यापासून तो कोल्हापुरातच वास्तव्यास होता अखेर त्याच्या घरच्यांनी संबंधित अल्पवयीन मुलीशी त्याचा विवाह ठरवला आस हा विवाह संपन्न होणार होता अशी माहिती पुढे आली आहे त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल गुजर अधिक तपास करत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT