Two brothers sentenced to life imprisonment in murder case 
कोल्हापूर

खून प्रकरणी दोघा सख्या भावांना आजन्म कारावास 

राजेश मोरे

कोल्हापूर - मौजे वाशी (ता. करवीर) येथील मंदिर परिसरात झालेल्या खून प्रकरणी दोघा सख्या भावांना न्यायालयाने दोषी ठरवले. त्या दोघांना आजन्म कारवासाची शिक्षा सुनावली आहे. महादेव मंगेश पुजारी (वय 44) व अशोक मंगेश पुजारी (दोघे रा. मौजे वाशी) अशी त्यांची नावे आहेत. सरकार पक्षातर्फे ऍड. मंजुषा पाटील यांनी काम पाहीले. 

मौजे वाशी (ता. करवीर) येथे नानासाहेब पुजारी राहतात. त्यांचे सख्खे भाऊ आण्णासाहेब आप्पाजी पुजारी (वय 47) यांच्यासह महादेव पुजारी, अशोक पुजारी ही भावकीही राहते. 11 मार्च 2018 ला गावातील बिरदेव मंदिर समोरील मोकळ्या जागेत जेवणाचा कार्यक्रम होता. समाज परंपरेनुसार कार्यक्रम झाल्यानंतर भावकितील लोकांना भांडी घासावी लागतात. जेवण झाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास आण्णासाहेब पुजारी हे भांडी घासण्यासाठी जात होते. त्याला महादेव व अशोक या दोघांनी विरोध केला. त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. यातून त्या दोघांनी चिडून पुजारी यांचे डोके झाडाच्या पारावर जोराने अपटून मारहाण केली. यात पुजारींच्या डोक्‍याला अंतर्गत दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नानासाहेब पुजारी यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार महादेव व अशोक पुजारी या दोघा संशयितावर खूनाचा गुन्हा नोंद झाला. याचा तपास तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. मंडले यांनी केला. 

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिश (वर्ग 1) डी. के. गुडधे यांच्या न्यायालयात सुरू झाली. सरकारपक्षातर्फे ऍड. मंजुषा पाटील यांनी 11 साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, सखाराम पुजारी, संजय काटकर, तीन वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर महादेव व अशोक पुजारी या दोघांना दोषी ठरवले. त्या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षाला या कामात करवीरचे पोलिस हवालदार महेश वाडकर व एम. एम. नाईक यांचे सहकार्य मिळाले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT