कोल्हापूर

पत्की हॉस्पीटलमध्ये रंगणार ‘दोन पिढ्यांचा जन्मोत्सव’

CD

पत्की हॉस्पिटलमध्ये
उद्या रंगणार
‘दोन पिढ्यांचा जन्मोत्सव’
कोल्हापूर ः ३७ वर्षांत पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या मुलांचा अनोखा स्नेहमेळावा रविवारी (ता. १९) हॉटेल सयाजीमध्ये सकाळी दहाला होणार आहे. १९८८ ते २००० या कालावधीत पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या मुलांची मुले पत्की हॉस्पिटलमध्येच आई-बाबा बनले, अशा दोन पिढ्यांचा जन्मोत्सव रंगणार आहे. शाहूपुरीत १९८७ मध्ये पत्की हॉस्पिटल सुरू झाले. त्यानंतर १९८८ मध्ये चार बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. यानंतर पालकत्वाचे आनंदाचे क्षण पत्की हॉस्पिटलमध्ये अनेकांनी अनुभवले. यापैकीच ज्यांचा जन्म पत्की हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांनी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलांचाही जन्म पत्की हॉस्पिटलमध्येच व्हावा, या हेतूने हॉस्पिटलचे ऋणानुबंध आणखी घट्ट केले. अशाच प्रकारची पहिल्या पिढीतील २०० व त्यांच्या पोटी जन्मलली २३४ मुले यांचा स्नेहमेळावा असेल. आई-वडील दोघेही तसेच त्यांच्या मुलांनीही पत्की हॉस्पिटलमध्येच पहिला श्वास घेतला अशा पाच जोड्याही मेळाव्यात असतील. यासोबतच डॉक्टरांची दुसरी पिढी म्हणजेच डॉ. श्वेता पत्की, डॉ. श्रीस्वरूप कुलकर्णी, डॉ. सह्रद पत्की, डॉ. आदिती पत्की हे रूग्णसेवेत दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT