कोल्हापूर

'वरद'च्या न्यायासाठी सोनाळी, सावर्डेच्या हजारो महिलां रस्त्यावर

मुरगूडात स्पेशल कमांडो फोर्स दाखल

प्रकाश तिराळे

मुरगूड (कोल्हापूर) : सोनाळी (ता.कागल) येथील खून झालेल्या वरदला न्याय मिळालाच पाहिजे,आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.या मागणीसाठी आज कागल तालुक्यातील सोनाळी आणि सावर्डे या गावातील दोन हजार पेक्षा अधिक महिला,नागरिकांनी मुरगूड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

सुमारे तीन तासापेक्षा जास्त काळ पोलीस ठाण्यासमोर या सर्वांनी आपल्या मागणीवर ठाम मांडले आहे. प्रचंड प्रमाणावर पोलीस कुमक, स्पेशल कमांडो फोर्स मागविण्यात आला आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय अधिकारी आर.आर.पाटील, मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास बडवे,पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव आपल्या मागणीवर ठाम राहीला.

सोनाळी आणि सावर्डे या गावातील दोन हजार पेक्षा अधिक महिला,नागरिकांनी मुरगूड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

यावेळी सावर्डेच्या नागरीकांनी मुरगूड नाका नं.१ पासून मोर्चा काढला.घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यावर आलेल्या या जमावाने पोलीस ठाण्यासमोर येवून ठाण मांडले. जोपर्यंत वरदला न्याय मिळत नाही,आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागण्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

पोलीस ठाण्या समोर प्रचंड गर्दी जमली

अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरु आहेत. नागरीकांनी पोलीसांना तपास कामात सहकार्य करावे. वरद हा जसे तुमचे लेकरु होते तसेच ते आमचे समजून तपास केला जाईल व आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचविले जाईल.अशी भूमिका जमावासमोर मांडली.

तरी देखील जमाव हालायला तयार नव्हता.पोलीस कुमक मोठ्या प्रमाणावर मागवण्यात आली.स्पेशल कमांडो फोर्स,महाराष्ट्र फोर्सचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. जमाव अद्यापही ठाण्याच्या दारात ठाण मांडून बसलेला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT