Vhannur village Selected for Gram Samridhi Abhiyan Hassan Mushrif Siddhanerli sakal
कोल्हापूर

सिद्धनेर्ली : ग्रामसमृद्धी अभियानसाठी व्हन्नूर गावची निवड; हसन मुश्रीफ

जीवनविद्या मिशन या सहयोगी मार्गदर्शक संस्थेच्या सहकार्याने ग्रामविकासाचा हा पॅटर्न राज्यभर राबविला जाईल

पंडीत कोईगडे

सिद्धनेर्ली : ग्रामसमृद्धी अभियानसाठी व्हन्नूर गावची प्रातिनिधिक स्वरूपात निवड केली आहे. जीवनविद्या मिशन या सहयोगी मार्गदर्शक संस्थेच्या सहकार्याने ग्रामविकासाचा हा पॅटर्न राज्यभर राबविला जाईल. त्यासाठी लागेल ती मदत केली जाईल.अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

व्हन्नुर ता. कागल येथे राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व जीवन विद्या मिशन यांच्या सहयोगातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसमृद्धी अभियानाचा प्रारंभवेळी ते बोलत होते.याबाबतचा राज्य शासनाच्या जीआरचे अनावरण करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मार्गदर्शक सहयोगी संस्था जीवन विद्या मिशनचे विश्वस्त सद्गुरु प्रल्हाद पै यांच्याकडे हस्तांतरित केला.

जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै म्हणाले,ग्रामस्थांची मानसिकता बदलून राज्य शासन व जीवन विद्या मिशन यांच्या सहयोगातून व्हन्नूर आदर्श गाव घडवू. आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांकडून त्यांना प्रशिक्षण देऊन आदर्श पद्धतीने कामे करून घेणार आहोत. गावातील तरुण, ज्येष्ठ, बालक, महिला या सर्वासाठी स्वतंत्र प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांच्यात गावाविषयी आपलेपणाची भावना निर्माण करणार आहोत. यावेळी सरपंच पूजा मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, उपसरपंच मंगल कोकणे, ग्रामसेविका योजना जंगम, दत्तात्रय पाटील, दीपक काळे, पंकज नाईक, संतोष तोतरे, गिरीश सुकाळे, आनंद राणे,विनोद मातोसे, अमर गावडे नवनाथ हळदकर आदी उपस्थित होते. स्वागत संतोष पाटील यांनी केले. आभार सागर सारंग यांनी मानले.

छायाचित्र- व्हन्नूर ता कागल येथे राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व जीवन विद्या मिशन यांच्या सहयोगातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसमृद्धी अभियानाचा प्रारंभवेळी राज्य शासनाचा जीआरचे अनावरणावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,,मार्गदर्शक सहयोगी संस्था जीवन विद्या मिशनचे विश्वस्त सद्गुरु प्रल्हाद पै .माणसातच देव यावेळी पै यांनी जीवन विद्या मिशन जात धर्म पंथ वंश या अशा गोष्टी मानत नाही.अंधश्रद्धा निर्मुलन,जुनाट रुढी,परंपरा, व्यसनाधिनता हटविण्यासाठी पुढाकार घेते.स्त्री -पुरुष समानता व भेदाभेद करू नये. ग्रामस्थांना देव माणसातच आहे. अशा पद्धतीची शिकवण आम्ही देतो असेही म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

Redbird Flight Training Academy: बारामतीतील रेडबर्ड फ्लाइट अकॅडमी पुन्हा चर्चेत; पाच वर्षांत अनेक विमान दुर्घटनांची नोंद, AAIB अहवालात धक्कादायक नोंदी!

Gold Import Duty: सोने-चांदीवर 15% इम्पोर्ट ड्युटी! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल इतके जास्त पैसे

Farmer Drowning: शेतीसाठी पाईप हलवताना काळाचा घाला; वसमत तालुक्यातील शेतकरी बुडून मृत, कालव्याच्या पाण्यात दोरी अडकली अन् अनर्थ घडला!

Mobile Price Hike : शॉकिंग! स्मार्टफोन्सची किंमत होणार डबल; कमी फीचर्स अन् जास्त दर, मोबाईल महागण्याचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT