The village of 20 thresholds is surrounded by fear 
कोल्हापूर

20 उंबऱ्यांच्या गावाला भीतीने घेरलेय

सकाळ वृत्तसेवा

करंजफेण (कोल्हापूर) ः मरळे (ता. शाहूवाडी) येथील संस्थात्मक अलगीकरण कक्षातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली. काल रात्री उशिरा पेरीड येथील केंद्रावर संबंधित रुग्णाला नेले. गावात उद्यापासून सात दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय कोरोना प्रतिबंधक ग्राम समितीने घेतला आहे. तब्बल बारा दिवसांनी आलेला पॉझिटिव्ह अहवाल अन अलगीकरण कक्षातील अन्य 20 साथीदार भीतीच्या छायेत आहेत. मरळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अन दोन स्वतंत्र खाजगी इमारत अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी अलगीकरण केले आहे. सर्वजण कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात.

दरम्यान ग्राम समितीच्या बैठकीला सरपंच अलका चव्हाण, उपसरपंच विलास सुतार, सदस्य लक्ष्मण कांबळे, बळीराम पाटील, उज्वला पाटील, पोलिसपाटील दीपक पाटील, माजी सरपंच आनंदा पाटील, संगणक परिचालक सचिन पाटील, ग्रामसेवक संभाजी चौगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल पाटील, मुख्याध्यापक विशाल हारगुले, अध्यापक विलास गुरव, आशा सेविका सुवर्णा पाटील,आरोग्य सेविका मनीषा चोपडे,सामाजिक कार्यकर्ते रंगराव चव्हाण,भगवान पाटील,युवराज सुतार आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT