Vishalgad Encroachment Dispute Sambhaji Raje Chhatrapati esakal
कोल्हापूर

'शिवभक्तांवर नको तर, माझ्यावरच गुन्हा दाखल करा'; संभाजीराजेंचा शाहूवाडी पोलिस ठाण्यात तब्बल अडीच तास ठिय्या

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सकाळ डिजिटल टीम

संभाजीराजे ठाण्यात येत असल्याचे समजताच परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शाहूवाडी : ‘शिवभक्तांवर नको तर माझ्यावरच गुन्हा दाखल करा’, अशी मागणी करत युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात (Shahuwadi Police Station) तब्बल अडीच तास ठिय्या मारला. पोलिस प्रशासनाकडून (Kolhapur Police) काहीच प्रतिक्रिया न देता मौन बाळगले गेल्याने ते पुन्हा कोल्हापूरला परतले.

रविवारी (ता. १४) गजापूर व विशाळगडावर झालेल्या वाहनांची मोडतोड व जाळपोळीच्या घटनेने तणावाचे वातावरण राहिले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. संभाजीराजे यांनी तातडीने शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषद सुरू असताना गुन्हा दाखल झाला आहे का, अशी विचारणा झाली. त्यावर त्याची माहिती करून घेण्यासाठी शाहूवाडी पोलिस ठाण्यात जाण्याची तयारी करत असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. काही वेळ शिवभक्तांशी चर्चा करून ते थेट शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. संभाजीराजे ठाण्यात येत असल्याचे समजताच परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाजीराजे यांनी ठाण्यात शिवभक्तांसमवेत जाऊन पोलिस प्रशासनाशी चर्चा करून गुन्हा दाखल झाला असेल तर अटक करा, असा पवित्रा घेतला.

पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्यासमोर ते बसून राहिले. त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ते ठाण्यातून बाहेर पडले. माध्यम प्रतिनिधिंशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘मुस्लिम बोर्डिंग व आमच्या घराण्याचे नाते वेगळे आहे. कालच्या मोहिमेत पन्नास ते साठ मुस्लिम बांधव सोबत होते. गडावर दोन्ही बाजूंची अतिक्रमणे आहेत ती काढावीत, अशी आमची मागणी असून, आता काढण्यात आलेली अतिक्रमणे हिंदूंची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT