Muslim Community esakal
कोल्हापूर

विशाळगडावरील 'अतिक्रमण'चा वाद चिघळला! माजी खासदार संभाजीराजेंना अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

Vishalgad Encroachment Dispute : माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या ‘चलो विशाळगड’ अभियानामुळेच गजापुरात तोडफोडीचा प्रकार घडला.

सकाळ डिजिटल टीम

गजापूर येथील घटनेमध्ये अल्पसंख्याक समाजातील घरांची तोडफोड करण्यात आली. अशा प्रकारातून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला.

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या ‘चलो विशाळगड’ अभियानामुळेच गजापुरात तोडफोडीचा प्रकार घडला. घरांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या (Muslim Community) विविध संघटनांनी केली. त्यासाठी त्यांनी दसरा चौकात निदर्शने केली. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारून मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. विशाळगड, गजापुरातील घटनेचे पडसाद काल शहरात उमटले. दुपारी एक वाजता मुस्लिम बोर्डिंगमध्ये विविध संघटनांची बैठक झाली. यामध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गजापुरातील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर काही संघटनांच्या प्रतिनिधींनी दसरा चौकात येऊन संभाजीराजे यांच्याविरोधात निदर्शने केली. यावेळी सर्वांनी संभाजीराजे यांना अटक करावी, अशी मागणी केली.

त्यानंतर मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने जाऊन निवेदने दिली. ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. महेश कांबळे, इम्रान सनदी, अस्लम मुल्ला, नुसरतशानूर मुजावर, राहुल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. शिष्टमंडळात गणी आजरेकर, शकिल अत्तार, रफिक मुल्ला, हुसेन मुजावर, गुलाब मुजावर आदींचा समावेश होता.

Muslim Community

अल्पसंख्याक समाजाला सुरक्षितता, आर्थिक मदत द्या

गजापूर येथील घटनेमध्ये अल्पसंख्याक समाजातील घरांची तोडफोड करण्यात आली. अशा प्रकारातून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. तसेच ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी समस्त मुस्‍लिम समाजातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हे निवेदन स्‍वीकारले. शिष्टमंडळात माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, मुस्ताक मलबारी, झाकीर कुरणे, युसूफ शेख, सलमान मौलवी, कासिम चाबुकस्वार, जाफर मलबारी आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT