Visit Ambabai at the crossroads  LED screens in ten places in kolhapur
Visit Ambabai at the crossroads LED screens in ten places in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांनो यंदा नवरात्रोत्सवात अंबाबाईचे दर्शन घ्या चौकाचौकात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अंबाबाई मंदिरात यंदाचा नवरात्रोत्सव भाविकांविनाच साजरा होणार असला, तरी नागरिकांना आता चौकाचौकात अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी शहरात दहा ठिकाणी एलईडी स्क्रीनची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिरातील धार्मिक विधी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होऊन देवीच्या दररोजच्या विविध रूपांतील सालंकृत पूजा, पालखी व इतर धार्मिक विधींचे दर्शन एलईडी स्क्रीनवर करून देण्यात येणार असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ललितपंचमी, अष्टमी आणि दसरा सोहळ्यासाठी अंबाबाईची पालखी यंदा सजवलेल्या वाहनातून जाणार आहे. ललितपंचमीला त्र्यंबोली भेटीला जात असताना पालखी शाहू मिल व टाकाळा येथे परंपरेनुसार थांबते. तेथे गर्दी होऊ नये याकरिता पालखी वाहनातून खाली उतरवली जाणार नाही. पालखीच्या आधी दीड दोन तास येथील रस्ते बॅरिकेडस्‌ लावून बंद करण्यात येणार आहेत. वाहनांत फक्त दोन पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. दररोज मंदिर सॅनिटायझरने निर्जंतुक केले जाणार आहे. धार्मिक विधीवेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येणार आहे. महाप्रसादही यंदा रद्द केला आहे.’’

दरम्यान, गरूड मंडप व देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर विविध भजनी मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हेही कार्यक्रम रद्द केले आहेत. समितीचे शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, मिलिंद घेवारी, सचिव विजय पवार आदी उपस्थित होते.

डिजिटल प्लॅटफॉर्म
नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन लाखो भाविक घेतात. यंदा भाविकांना प्रवेश नसला तरी दर्शन घेता यावे याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मवर अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. शहरातील प्रमुख दहा ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. उभा मारुती चौक, बावडा चौक, राजारामपुरी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, ताराबाई रोड व मंदिराच्या चारही दरवाज्यांजवळ स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

दृष्टिक्षेपात
 उत्सवकाळात मणिकर्णिका कुंडाचे काम बंद
 भाविकांना मंदिरात प्रवेश नाही
 मोजक्‍याच व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक विधी
 कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी
 नगरप्रदक्षिणा व पालखी सजवलेल्या वाहनांतून

संपादन -अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT