Visit Shri Dattaguru from the arch ...
Visit Shri Dattaguru from the arch ... 
कोल्हापूर

श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्या कमानीपासूनच... 

सकाळवृत्तसेवा

नृसिंहवाडी : शिरोळ परिसरात वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर येथे उद्यापासून तीन दिवस लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे; मात्र ग्रामस्थांसाठी जीवनावश्‍यक वस्तू एक दिवस चालू राहतील. भाविकांना ग्रामपंचायत कमानीच्या आत सोडण्यात येणार नसून त्यांनी कमानीपासूनच दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचे आहे. ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी, आरोग्य विभाग व कोरोना समितीची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेतला. ही माहिती कोरोना समन्वय समितीचे सदस्य प्रतिक धनवडे यांनी दिली. 

आलास, कुरुंदवाड, नांदणी व जयसिंगपूर भागामध्ये बऱ्याच कालावधीनंतर पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रविवारी (ता. 5) होणारी गुरुपौर्णिमा व अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी श्रद्धेने येथे येतात. रविवारी पाच तारखेला गुरुपौर्णिमा उत्सव असल्यामुळे दरवर्षी हजारो भाविक दत्तगुरूंचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करतात. त्याचपद्धतीने यावर्षी गर्दीचा संकेत लक्षात घेऊन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोरोना समितीने शनिवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

चार ते पाच दिवसांमध्ये कोल्हापूर व परिसरातील अनेक भाविकांनी येथे कार्यक्रमानिमित्त गर्दी केली होती. त्यामुळे विविध भागातून आलेल्या भाविकांचा संसर्ग होऊ नये व त्यापासून आजारास निमंत्रण मिळू नये यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आज बैठक झाली. त्यावेळी शनिवारपासून तीन दिवस गावातील व्यवहार बंद करण्याचा करण्याचा निर्णय एकमुखी घेतला गेला. 

चौथी पौर्णिमाही भाविकांविना... 
एकशे तीन दिवस दत्त मंदिर बंद असल्यामुळे रविवारी येणारी चौथी पौर्णिमाही भाविकांविना साजरी होणार असल्यामुळे भाविकांत नाराजी आहे. दत्त मंदिराचे द्वार उघडून आम्हाला लवकरात लवकर दर्शन मिळावे ही त्यांची आस आहे. दत्त मंदिर लवकर सुरू करावे, अशी मागणी पत्राद्वारे देवस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे. 

दृष्टिक्षेप 
- नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या बैठकीत निर्णय 
- शिरोळमध्ये कोरोना रूग्ण सापडल्याने तीन दिवस लॉकडाउन 
- जीवनावश्‍यक वस्तू एक दिवस मिळणार 
- भाविकांमधून नाराजीचा सूर 

कोल्हापूर
कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT