कोल्हापूर

कौटुंबिक नैराश्यातून कोडोलीच्या मायलेकींची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कोडोली : वारणा नदीवरील कोडोली - चिकुर्डे (ता. पन्हाळा) या धरण पुलावरून मंगळवार ता. २४ रोजी रात्री उशीरा आईने व दत्तक घेतलेल्या मतिमंद मुलीसह उडी घेवून आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला आहे. रेश्मा अमोल पारगावकर (वय ३६) मुलगी रुद्रा (वय ७) रा पांडुरंग तात्या कॉलनी कोडोली ता.पन्हाळा असे त्यांची नाव आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. पतीचे अपघाती निधन व दत्तक मुलगी मतिमंद असल्याने आलेल्या नैराशेतून आत्महत्या केल्याचे पोलिसांना मिळालेल्या लिहलेल्या चिठ्ठी मधूम समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी,

कोडोली येथील रेश्मा व तिच्या पतीने चार महिन्याची रुद्रा ही मुलगी दत्तक घेतली होती. परंतु दहा महिन्यानंतर ती मतिमंद असल्याचे त्यांना समजले होते .तरीही त्यांना तिचा लळा लागल्याने तिचा चांगला सांभाळ करत होते. रेश्मा ही कोडोली येथील खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. रेश्मा हीच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. दत्तक घेतलेली मुलगी रुद्रा ही मातीमंद व पतीचे निधन त्यामुळे ती अस्वस्थ होती.

रेश्मा यांनी रुद्रासह मंगळवार ता.२४ रोजी रात्री उशीरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार व अन्य एका तरुणाने सुमारे दोन तास त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत पाठवल्याचे समजते. रात्री उशिरा तिने मुलीसह नदी पत्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले. त्यांनी ही बाब कोडोली पोलिसांना कळवली. अंधार असल्याने त्यांना शोधता आले नाही.

आईने व दत्तक घेतलेल्या मतिमंद मुलीसह उडी घेवून आत्महत्या केली.

आज सकाळी घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव व कर्मचारी तलाठी अनिल पोवार आपत्ती व्यवस्थेत मदत करणारे तरूण, गनिमी कावा ग्रुपचे कार्यकर्ते यांच्या सयुक्तपणे कोडोली ग्रामपंचायतीच्या आपत्कालीन बोटीने शोध घेण्याचे काम सुरू केले असता सकाळी आई रेश्मा हिचा तर तर दुपारी चारच्या सुमारास मुलगी रुद्रा हीच मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT