Warning to lock the bank if gold is not received within fortnight 
कोल्हापूर

पंधरा दिवसांमध्ये सोने न मिळाल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

धामोड : येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये दहा महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. अद्यापही या चोरीचा उलगडा झालेला नाही. यामध्ये सतरा जणांचे सोने चोरीला गेले होते. संबंधितांना अद्यापही हे सोने परत मिळाले नाही. याबाबत बँकेकडून त्यांना वारंवार केवळ आश्वासनाची तारीख दिली जात आहे. यामुळे संतप्त सभासदांनी पंधरा दिवसांमध्ये सोने न मिळाल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा शाखाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

येथील युनियन बँकेमध्ये झालेल्या चोरीची राज्यभर चर्चा झाली. बँक प्रशासन व पोलिसांनी चोरी झाली नसल्याचा खुलासा पहिल्या दिवशी केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी 16 लाख रुपयाचे सोने चोरीला गेल्याचा खुलासा प्रशासनाने केला. याबाबत राधानगरी पोलिसात गुन्हा देखील नोंद करण्यात आला. मात्र गेली वर्षभर उलटून देखील पोलीस प्रशासनाला चोरीचा छडा लावता आलेला नाही. सोने चोरीला गेलेल्या संबंधितांना बँकेने केवळ आश्वासनाची वलग्नाच कली आहे. संबंधितांना सातत्याने बँकेकडून टाळण्याचा प्रकार केला जात आहे. यासंबंधात पंधरा दिवसात योग्य तो निर्णय न झाल्यास बँकेलाच टाळे ठोकण्याचा इशारा संबंधितांनी शाखाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. राधानगरी पोलिस स्टेशनला देखील याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर माऊली माने, प्रकाश सुतार ,रमेश पाटील ,कृष्णात पाटील ,दीपक पाटील, धनाजी कुंभार यांच्या अठरा जणांच्या सह्या आहेत.

याबाबत येथील शाखाधिकारी कौमुद भारद्वाज यांना विचारले असता, ते म्हणाले, . " आज आलेले निवेदन वरिष्ठांना पाठवण्यात आलेले आहे. याबाबत मुख्य बँकेच्या कार्यालयाकडून निर्णय घेतला जाईल. या प्रकरणाबाबत बँकेकडून योग्य ती कार्यवाही सुरू आहे . " 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT