Water level of Kalamba lake at 19 feet due to leakage and excessive water subsidence 
कोल्हापूर

गळती व बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावाची पाणी पातळी 19 फुटावर 

संजय दाभाडे

कोल्हापूर : गळती व बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावातील 30 टक्के पाणीसाठा कमी झाला. तलावाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडू लागले आहे. महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने तलावांमधील पाणी उपशाचे योग्य नियोजन केले नाही तर कळंबा गावाला ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, तलावाची पाणी पातळी 19 फुटांवर पोहोचली असून जलचरांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तलावांतून नऊ फूट पाणी उपसा करावा लागणार आहे. 
यंदा मुबलक पाऊस पडल्यामुळे तलाव सहावेळा ओसंडून वाहिला. तलावात मुबलक साठा झाला होता. पाणी पातळी 27 फुटावर पोहोचली होती. मात्र पाच महिन्यांत महापालिकेने तलावांमधून बेसुमार पाणी उपसा सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर बंधारा नजीक शाहू कालीन पाटामधील गळतीतून दररोज लाखो लिटर पाणीसाठा वाहून ओढ्या नाल्यात वाया जात आहे. त्यामुळे तलावाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असून पाच महिन्यांत आठ फूट पाणीसाठा कमी झाला आहे. तलावांमधून दररोज सात एमएलडी पाणी उपसा केला जात आहे. त्यात निम्म्या शहरासाठी महापालिका सहा एमएलडी पाणी उपसा करत आहे. तर कळंबा ग्रामपंचायत 1 एमएलडी पाणी उपसा करत आहे. दरम्यान, नागरी वहिवाट, उद्योग व हॉटेल व्यवसायातून निर्माण होणारे सांडपाणी ओढ्या नाल्याद्वारे तलावात मिसळते. 
दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात तलावात सोडली जातात. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. तलावाचे काठ दलदलीने भरून गेले असून निर्माल्य, देव-देवतांचे फोटो, प्लास्टिक कचरा तलावाभोवती साचत आहे. 


महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन कळंबा तलावातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. कळंबा गावासाठी राखीव पाणी साठा शिल्लक ठेवून उपसा करावा, गरज पडल्यास तलावातून पाणी उपसा बंद करण्याचा आहे. याबाबत महापालिकेशी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे. 
- सागर भोगम, सरपंच, कळंबा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

SCROLL FOR NEXT