What exactly is the boundary of Shivaji University  
कोल्हापूर

सांगा, शिवाजी विद्यापीठाची हद्द नेमकी कोणती? ओल्या पार्ट्यांना उत 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाची हद्द समजावी म्हणून कंपाउंड बांधले; मात्र एस.एस.सी. बोर्डजवळ कंपाउंड पाडून पायवाट केली आहे. विद्यापीठाच्या परिसरात सर्रास ओल्या पार्ट्या चालतात. म्हशी चरायल्या सोडल्या जातात. या ठिकाणी असणारी सुरक्षारक्षकांची चौकीही हलवली आहे. हे सर्व पाहिले की, सांगा, विद्यापीठाची हद्द नेमकी कोणती? असा प्रश्‍न पडतो.  

शिवाजी विद्यापीठाला आठशे एकर परिसर मिळाला आहे. विद्यापीठाची हद्द लक्षात यावी, तेथे अतिक्रमण होऊ नये, यासाठी दगडी कंपाउंडही बांधण्यात आले; मात्र एस.एस.सी. बोर्ड ते राजेंद्रनगर या भागात विद्यापीठाच्या हद्दीमध्ये राजरोसपणे मानवी हस्तक्षेप सुरू आहे. विद्यापीठाचे कंपाउंड पाडून काही जणांनी पायवाट केली आहे. येथे आत म्हशी चरण्यासाठी आणल्या जातात. रात्री ओल्या पार्ट्या चालतात. गेल्या महिन्यात येथे एका व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्याही केली होती. या भागातील नागरी वस्तीमधील सांडपाणीही विद्यापीठाच्या हद्दीत सोडले आहे. पूर्वी कंपाउंडच्या जवळच एक सुरक्षारक्षकांची चौकी होती. येथे सुरक्षारक्षक होते; पण  आता ही चौकी येथून हलवून आत नेली आहे. 

विद्यापीठाची हद्द कोणती? 
येथे विद्यापीठाच्या कंपाउंडच्या आतही घरांचा काही भाग दिसतो. तर विद्यापीठाच्या हद्दीतच एक बंगला दिसतो. त्यामुळे विद्यापीठाची हद्द नेमकी कोणती? या घरांचे हे अतिक्रमण आहे का? असे प्रश्‍न उपस्थित होतात.
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT