Crime Sakal
कोल्हापूर

तिकिटाची विचारणा केल्यास 'वाहक' व 'चालक' यांना बाचाबाची

प्रवाशाला तिकीटाची विचारणा केल्याच्या कारणावरून झालेच्या बाचाबाचीत वाहक व चालक यांना मारहाण करण्यात आली आहे.

अर्चना बनगे

दाभोळ : प्रवाशाला तिकीटाची विचारणा केल्याच्या कारणावरून झालेच्या बाचाबाचीत वाहक (Conductor) व चालक (Driver) यांना मारहाण करण्यात आली आहे. दोपोली पोलिसांनी दोन संशयीतांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल ता.२७ रोजी दापोली बसस्थानकातून ४.१५ ची दापोली दाभोळ हि बस सुटली वाहक सुरज खेडेकर यांनी प्रवाशांची तीकीटे काढायला सुरुवात केली या बसमध्ये प्रवाशांची खूप गर्दी होती. वाहक खेडेकर यांनी एका प्रवाशाला कुठे जायचे आहे कोणते तिकीट देऊ असे विचारले असता या पुरुष प्रवाश्याने माझ्या पत्नीने तिकीट काढले असल्याचे सांगितल्यावर वाहक खेडेकर यांनी तुमचे तिकीट कोणी काढले आहे.

ती व्यक्ती दाखवा असे या प्रवाश्याला सांगितल्यावर या प्रवाश्याला त्याचा राग आला व त्याने वाहक खेडेकर याला तुला कंडकटर कोणी केले असे म्हणत त्यांनी खेडेकर यांना शिवागाळ करण्यात सुरुवात केली. तेव्हा चालक सचिन राजेशिर्के यांनी आता बस पोलीस ठाण्यात घेऊन जाऊया असे वाहक खेडेकर यांना सांगताच बसमधील प्रवाशांनी कशाला उगाच आमचा वेळ घालवत आहात असे म्हटल्यावर बस दाभोळकडे मार्गस्थ करण्यात आली.

हि बस ४.२५ वाजता वळणे येथील थांब्यावर आली असता वाहकाला शिविगाळ करण्याऱ्य़ा प्रवाशाचा एक मित्र बसमध्ये चढला व त्याने माझ्या भावाला का शिवीगाळ केली असे वाहक खेडेकर यांना विचारले तेव्हा शिवीगाळ कोणी केली हे गाडीतील प्रवाशानाचा विचारा असे म्हटल्यावर त्याने खेडेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली हि मारामारी सोडविण्यासाठी चालक सचिन राजेशिर्के आले असता त्यानाही या व्यक्तीने धक्काबुक्की करून मारहाण केली.

त्यानंतर बसमधील प्रवाशांनी मध्यस्ती केल्यावर शिवीगाळ करणारा प्रवासी व त्याचा मित्र बसमधून उतरले व गाडीसमोर येऊन चालक व वाहक यांना शिवीगाळ करून निघून गेले. बसमधील इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता राकेश बाळकृष्ण मोहिते व रितेश मोहिते रा. वळणे अशी त्यांची नावे असल्याचे समजले.

त्यानंतर हि बस दाभोळ येथे जाऊन परत आल्यावर वाहक सुरज खेडेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात या दोन संशयिताविरोधात तक्रार दाखल केली असून, दापोली पोलिसांनी त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल संदीप गुजर करत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण करून एक दिवस झाला तरी अद्याप मारहाण करणाऱ्यांना दापोली पोलसांनी अटक न केल्याने एसटीचे कर्मचारी संतप्त झाले असून संशयिताना अटक न केल्यास एसटीची वाहतुक बंद करू असा लेखी इशारा दापोली आगारातर्फे दापोली पोलिसांना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT