women wager police swoop in jaysingpur kolhapur police arrested in jaysingpur
women wager police swoop in jaysingpur kolhapur police arrested in jaysingpur 
कोल्हापूर

धडक मोहीमेत महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : शहरातील जयसिंगनगरमध्ये तीन पानी जुगार खेळणाऱ्या सात महिलांसह पुरुषावर कारवाई केली. यावेळी 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात जुगार खुलेआम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मीना किरण काळे (संभाजीनगर, धोत्रे यांच्या घरी भाड्याने, जयसिंगपूर), छाया जगनू लोंढे (इंदिरानगर झोपडपट्टी, सिव्हील हॉस्पिटलजवळ सांगली), हेमा धर्मेंद्र कसबेकर (टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (केर्ली सध्या रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), वर्षा इकबाल लोंढे (कोरोची ता. हातकणंगले), ज्योती नामदेव पाटील (समडोळी मळा, जयसिंगपूर), बेबी दौलत शेख (संभाजीनगर झोपडपट्टी, जयसिंगपूर), अर्जुन कल्लाप्पा वसगडे (मंगेश्‍वर कॉलनी उचगाव ता. करवीर) यांच्यावर कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शहनाज आलम कनवाडे यांनी फिर्याद दिली आहे. तपास सावंत करत आहेत. 

धडक मोहीम 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शहर आणि परिसरात अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याआधी सुमारे अडीच लाखांचा गुटखा जप्त केला होता. दारूभट्ट्यांवरही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT