शिवाजी विद्यापीठात बेमुदत कामबंद  sakal
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात बेमुदत कामबंद

सेवक संयुक्त समितीचे राज्यव्यापी आंदोलन; मागण्यांचे कुलगुरूंना दिले निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे. यासह अन्य मागण्यांसाठी महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचे आठवडाभरापासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा अंतिम टप्पा म्हणून आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी सेवक कृती समितीने मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांना दिले. विद्यापीठातील कामकाज दिवसभर ठप्प राहिले असून, सर्व राज्यात आंदोलन सुरू आहे.

विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजता मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. त्यांनी घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे कार्यालयात शुकशुकाट होता.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आंदोलन शासनाने महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांवर लादले आहे, कारण शासनाने महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक/अधिकारी यांच्यात दुजाभावाची वागणूक देऊन अधिकारी व शिक्षकांना सातवा वेतन लागू केला, मात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवले. आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर महासंघाचे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी आहेत. आजच्या आंदोलनाच्या नियोजनात शिवाजी विद्यापीठ कृती समितीने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे मिलिंद भोसले, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे राम तुपे, शशिकांत साळुंखे, विशांत भोसले, सुरेश पाटील, दीपक काशीद, राजू चव्हाण आदी सहभागी झाले होते.

मागण्या अशा

  • सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे

  • तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे

  • सातव्या वेतन आयोगातील ५८ महिन्यांची थकबाकी अादा करावी

  • उर्वरित ७९६ पदांचा सातवा वेतन आयोगाच्या वेतन संरचनेचा निर्णय निर्गमित करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT