World Bamboo Day sakal
कोल्हापूर

World Bamboo Day : चिवाकाठीला हवी हक्काची बाजारपेठ

गगनबावड्यात विक्रमी उत्पादन; मिळेल त्या दरामुळे उत्पादक शेतकऱ्यांत नाराजी

पंडित सावंत

असळज : गगनबावडा तालुक्यात कित्येक पिढ्यांपासून बांबूचे (चिवाकाठी) उत्पादन घेतले जाते. तालुक्‍यात चिवाकाठी मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध असून, डोंगराळ तसेच पडीक जमिनीतही यातून चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळते. कमी खर्चात वर्षाला लाखोंचे उत्पादन मिळवून देणाऱ्या व तालुक्याची वार्षिक उलाढाल कोटीत असणाऱ्या चिवाकाठीच्या विक्रीसाठी गगनबावडा तालुक्यातच हक्काची बाजारपेठ असणे गरजेचे आहे.

गगनबावडा तालुक्यात असणारा बांबू हा माणगा या जातीचा असून, त्याची चिवा, मेसकाठी या नावाने ओळख आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात बांबूचे पीक कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते. बांबू तोडून कोल्हापूरच्या बाजारपेठेत नेऊन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही तालुक्यात मोठी आहे. केवळ बांबू उत्पादित करायचा आणि व्यापाऱ्यांमार्फत विक्री करायचा व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात समाधान मानायचे, अशी तालुक्यातील सद्यस्थिती आहे.

आज बाजारपेठेत माणगा जातीच्या बांबूला सर्वाधिक मागणी आहे. बागायती फळपिकांना आधार देण्यासाठी व कारागिरांना विणकामासाठी या बांबूचा वापर होतो. बांधकाम व्यवसायात आरसीसी कामाच्या पायाडासाठी तसेच बुरूड समाजातून सुपे, बुट्ट्या तयार करण्यास या बांबूला विशेष प्राधान्य दिले जाते. अलीकडे मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल व रेस्टारंटमध्ये बांबू हाऊस निर्मितीसाठी या माणग्याचा वापर होत आहे.

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध असणाऱ्या या चिव्‍यांच्‍या विक्रीस कोल्हापूर शहर व उपनगरांत बाजारपेठ उपलब्‍ध आहे. तालुक्यात चिवा तोडणी करून तो कोल्‍हापूरच्‍या बाजारपेठेत विक्रीसाठी न्यावा लागतो. याठिकाणचे व्‍यापारी भाव पाडून मागतात. तालुक्यातील चिवाकाठी कवडीमोल दराने खरेदी करून ती कोल्‍हापूर, सांगली जिल्ह्यांतील व्यावसायिक व द्राक्ष बागायतदारांना पुरविणारे अनेक व्‍यापारी गगनबावड्यात आहेत. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तालुक्यातील चिवाकाठीस असलेली मोठी मागणी, त्यापासून तयार होणारी विविध उत्पादने याचा विचार करता तालुक्यातच चिवा विक्रीसाठी हक्‍काची बाजारपेठ होण्याची गरज आहे.

तालुक्यातून वर्षाकाठी ५०० ते ८०० ट्रक चिव्यांच्या विक्रीतून १५ ते १६ कोटींची उलाढाल होते. बल्कोवा, टुल्डा व माणगा जातींची बांबूंची २०० एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. बल्कोवा जातीचा बांबू हा एकरात ४० ते ५० टन निघत असून, वीजनिर्मितीत इंधन म्हणून त्याचा वापर करण्याच्या चाचण्या झाल्या आहेत. चिवाकाठीस चांगला दर मिळावा, यासाठी शासनाने गगनबावडा तालुक्यात बाजारपेठ निर्माण करण्यास प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- अरुण वांद्रे, इंधन व्यवस्थापक, सहवीजनिर्मिती प्रकल्प,

डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT