wrestling mat fraud in zilha parishad kolhapur rupees 16 lakh not clear till the day in kolhapur 
कोल्हापूर

१६ लाखांच्या मॅट घोटाळ्यातील भागीदार कोण ? अधिकाऱ्यांचे मात्र तोंडावर बोट

सदानंद पाटील

कोल्हापूर : दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेच्या माथी १६ लाखांचे कुस्तीचे निकृष्ट मॅट मारले. मॅटवर खेळताना एक खेळाडू जायबंदी झाला. मुळातच जे मॅट पुरवले होते, ते कुस्तीसाठी उपयोगीच नव्हते. एकूणच जिल्हा परिषदेतील मॅट घोटाळा ‘सकाळ’ने उघडकीस आणला. क्रीडा विभागाने मॅट निकृष्ट असल्याचा अहवाल दिला. मात्र अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

पाठपुराव्यामुळे  लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. दरम्यान सत्ता बदल झाला. पुन्हा एकदा नव्याने चौकशी समिती नेमली आहे. हा अहवाल कधी येणार व कोणावर कारवाई होणार, याकडे लक्ष आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने शिंगणापूर येथे क्रीडा प्रशाला सुरू केली. कुस्तीचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. कुस्तीच्या सरावासाठी जिल्हा परिषदेने १६ लाखांची मॅट खरेदी केली. ऑलिंपिक दर्जाची मॅट खरेदी केल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. मात्र या मॅटवर अपघात होऊन एक विद्यार्थी जायबंद झाला.

निकृष्ट मॅटमुळेच अपघात झाल्याचे पुढे आले. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र सकाळने हे प्रकरण पुढे आणले. गेली दीड वर्षे ‘सकाळ’ने या मॅट घोटाळ्याचा पाठपुरावा केला.
मॅटचे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी तक्रारदाराला धमकावणे, दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र पाठपुराव्याने चौकशी समिती नेमली. या समितीने मॅट कुस्तीसाठी योग्यच नसल्याचा अहवाल दिला. जर ही मॅट योग्य नसेल तर ती खरेदी का केली, कोणी केली, स्पेसिफिकेशन कोणी दिले, त्याची तपासणी कोणी केली, दिलेल्या सूचनांनुसार मॅट आली नव्हती तर ती स्वीकारण्याचे कारण काय? पुरवठादाराने चुकीची मॅट का दिली असे अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत.

"दीड वर्षे मॅट घोटाळ्याचा पाठपुरावा सुरु आहे. कधी पदाधिकारी तर कधी अधिकारी चालढकल करीत आहेत. काही भ्रष्ट अधिकारी कवचकुंडले मिळाल्याप्रमाणे वागत असून चौकशीस टाळाटाळ करत आहेत. मात्र हे जास्त काळ चालणार नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ खपवून घेणार नाही. आता जर टाळाटाळ करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र खैर नाही."

- पै. विजय बोरगे, सदस्य

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Shirala Mini Konkan Monsoon Tourism : लोणावळा-महाबळेश्वर विसरा! शिराळ्याचं 'मिनी कोकण' धुक्यात न्हालं; विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी, कास पठारसारखं खुललं सौंदर्य

Latest Marathi News Live Update : एसटी भाडेवाढीचा निर्णय लांबणीवर; उन्हाळी १० टक्के वाढीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT