Raireshwar Fort esakal
कोल्हापूर

Raireshwar Fort : 'तो' सेल्फी ठरला अखेरचा! रायरेश्वर किल्ल्यावरुन खाली दरीत कोसळून हुपरीच्‍या तरुणाचा मृत्यू

रायरेश्वर किल्ल्यावर (Raireshwar Fort) गडकोट मोहिमेदरम्यान (Gadkot Mohim) एक तरुण पाय घसरून दरीत कोसळला.

सकाळ डिजिटल टीम

पायवाटेने जाताना सागर पाय घसरून दरीत कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला. पाऊण तासानंतर तो दरीत जखमी अवस्थेत आढळला.

हुपरी : भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर (Raireshwar Fort) गडकोट मोहिमेदरम्यान (Gadkot Mohim) एक तरुण पाय घसरून दरीत कोसळला. तरुण सागर पांडुरंग वाईंगडे (वय २५, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, गुरुवारी (ता. २५) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

येथील दहा-बारा तरुण गडकोट मोहिमेसाठी रायरेश्वरावर बुधवारी मुक्कामी गेले. गुरुवारी सकाळी ९ वाजता ते प्रतापकडाकडे जायला निघाले. त्यावेळी पायवाटेने जाताना सागर पाय घसरून दरीत कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला. पाऊण तासानंतर तो दरीत जखमी अवस्थेत आढळला.

मात्र, त्याला दरीतून बाहेर आणण्यासाठी त्यांना रस्ता सापडला नाही. त्यामुळे ते दरीत फिरत राहिले. दुपारी दोनच्या सुमारास भोरच्या सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भोरच्या जवानांनी दरीत शोध घेऊन त्यास उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रोहन गोंधळी यांनी पोलिसांना खबर दिली, अशी माहिती भोर पोलिसांनी दिली.

अखेरचा सेल्फी...

सागर पाच-सहा वर्षांपासून धारातीर्थयात्रेसाठी जात असे. तो अविवाहित होता. तो त्याच्या मामाकडे चांदी काम करत होता. येथून रवाना होण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांसमवेत एक सेल्फी घेतला होता. त्यांनतर मोहिमेदरम्यान त्याने घेतलेला सेल्फी अखेरचा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT