कोल्हापूर

बेस्ट गुरुजी! 2 शिक्षकांनी केला धनगरवाड्यावरच्या शाळेचा कायापालट

तालुक्यातील बोरमाळ धनगरवाड्यावरच्या शाळेची ही कहाणी आहे.

डी. आर. पाटील

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील्या (shahuwadi) कोणत्याही धनगरवाड्या-वस्तीवर बदली म्हणजे शिक्षा अशीच अनेक शिक्षकांची (teacher) धारणा आहे. पण जिल्हा परिषदेच्या (zilha parishad school) गळक्या, पडक्या शाळेत जाऊनही दोन शिक्षकांनी महागड्या हॉटेल-विश्रामगृहाला लाजवेल असेच शाळेचे रुपडे पालटून कामाचा ठसा उमटवला आहे. तालुक्यातील बोरमाळ (bormal) धनगरवाड्यावरच्या शाळेची ही कहाणी आहे.

रामचंद्र चिले (पैजारवाडी) व संतोष माने (अकिवाट)या दोन शिक्षकांची बदली येथे झाली, तेव्हा शाळा गळत होती, गावातल्या मुलांचा शिकण्याकडे ओढाही जेमतेमच. म्हणून या दोन शिक्षकांनी इमारतीबरोबरच मुलांच्या व पालकांच्या मानसिकतेचेही रुपडे पालटण्याचा निर्णय घेतला. गावची लोकसंख्या २२५, पहिली ते पाचवीपर्यंत १७ मुलांची दोन शिक्षकी शाळा. गावातल्या महिला रानमेवा विकून, काही पुरुष मंडळी कोकणात घरोघरी तवा विकण्यासाठी, तर काही मुंबईला रोजीरोटीसाठी, अशा ठिकाणची शाळा बदलण्यासाठी गुरुजींनी हाक दिली आणि बघता-बघता साडेतीन लाख रुपये जमा झाले. गावकरी, मित्रमंडळी, कोल्हापूरचे व्ही. टी. पाटील फाऊंडेशन यांच्याबरोबरच थेट अमेरिकेतून ४० हजारांची देणगी जमा झाली.

हा बदल करण्यासाठी दोन्ही गुरुजींनी पहिल्यांदा खोरं, पाटी, टिकाव हातात घेतले आणि बघता-बघता अख्खा गाव दिवस-रात्रपाळीने चिमणी-पाखरांच्या शैक्षणिक निवाऱ्यासाठी पुढे आला. या बाह्य बदलाबरोबरच मुलांच्यातही दोघांनी ‘संस्कार तिजोरी’ नावाच्या उपक्रमाद्वारे सकारात्मक बदल घडवून आणले.

२६ कुटुंबांची शाळेस देणगी

रामचंद्र चिले व संतोष माने यांनी गावकऱ्यांच्यात शिक्षणाविषयी एवढी सत्कारात्मकता पेरली की,ज्या गावात एकही उच्च शिक्षित अथवा नोकरदार नाही. तेथील हातावरचे पोट असणारी गावातली २६ कुटुंबे प्रत्येकवर्षी २६ हजार रुपये शाळेस देणगी देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेसवेवर मोठा अपघात, भाजपा आमदारांच्या ताफ्यातील गाडीला ट्रकची धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Karad Flyover Trial: कऱ्हाड उड्डाणपुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू; दोन वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

SCROLL FOR NEXT