इम्तियाज अब्दुल रझाक काळसेकर
इम्तियाज अब्दुल रझाक काळसेकर sakal
पश्चिम महाराष्ट्र

दुबईतील मोठ्या कोळंबी शेती प्रकल्पावर कोकणी मुद्रा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: संयुक्त अरब अमिरातीमध्ये आधुनिक शाश्वत पद्धतीने कोळंबीची शेती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत असून तो (JAFZA) जेबल अली फ्री झोनच्या परिसरात उभा राहणार आहे. या भागातील हा पहिलाच खाऱ्या पाण्यातील कोळंबीचा प्रकल्प आहे. त्यासाठी भारतीय उद्योजकाची मदत घेतली जात असून हे उद्योजक मूळ रत्नागिरीतील आहेत. ते व्यवसायानिमित्त संयुक्त अरब अमिरातीमध्ये असून एवढ्या मोठ्या प्रकल्पावर कोकणची मुद्दा उमटली आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या नॅशनल अ्क्वाकल्चरची शाखा असलेली प्राईम अॅक्वाकल्चरचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. इम्तियाज अब्दुल रझाक काळसेकर यांचे वडील रत्नागिरीतील आहेत. उद्योगाकरिता ते दुबईत गेले. इम्तियाज काळसेकर हे तेथील मोठे उद्योगपती असून या कोळंबी प्रकल्पात त्यांचा मोठा सहभाग आहे. जाफजा (JAFZA)कंपनीशी कोळंबीच्या आर. ए. एस. या पद्धतीने कोळंबीची शेती करण्याबाबत प्राईम अँक्वाकल्चरशी करार झाला. त्यासाठी (RAS म्हणजे रिसर्क्युलेशन अॅक्वाकल्चर सिस्टिम म्हणजेच मत्स्य संवर्धनाची पद्धत) वापरण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीची खाद्यान्न क्षमता वाढवण्यासाठी तेथील सरकार विविध पावले उचलत असून हा प्रकल्प त्याचाच भाग आहे. या द्वारे या देशाची अन्नसुरक्षाही वाढवण्यात येत आहे. या देशाचा खाद्यान्न व्यापार १०० दशलक्ष दिनारहून अधिक आहे. तसेच फूड आणि बिव्हरेज यामधील गुंतवणूक ६२ दशलक्ष दिनार आहे, अशी माहिती अब्दुल्ला बिन दामिथान यांनी दिली. ते डी.पी. वर्ल्ड (यूएई) आणि जाफजाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या देशाच्या अर्थचक्राला फूड अँड बिव्हरेजद्वारे मोठ्या प्रमाणात गती दिली जाते याचाच हा पुरावा आहे, असे सांगून अब्दुल्ला म्हणाले, या क्षेत्रातील आमची भागिदारी आणि तांत्रिक गुंतवणूक यामुळे उत्पादनक्षमता वाढणार आहे. दीर्घकालीन अन्नसुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे आहे.

जीबेल अली फ्री झोन येथील सुविधांमध्ये खाऱ्या पाण्यातील कोळंबीची शेती हॅचरी प्रक्रिया करणारे उद्योग यांचा समावेश आहे. प्राईम अॅक्वाकल्चर आरएएस तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात करणार आहे. त्यामुळे पाण्याचा अवघा ५ ते ७ टक्के निचरा होताना प्रकल्पातून एका वर्षाला एक हजार टनाहून अधिक कोळंबीचे उत्पादन करण्यात येणार आहे. सध्याचे या देशाचे कोळंबीचे उत्पादनापेक्षा हे उत्पादन तिप्पट आहे. संयुक्त अरब अमिरातीला कोळंबी देशांतर्गत पुरवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. दरवर्षी ५१ हजार टन कोळंबी आयात केली जाते. कोळंबीचा एकूण वापर ३८ हजार ते ४० हजार टन आहे. कोविडपूर्व आयात ५१ हजार १०८ टनावर गेली होती तर निर्यात १२ हजार टन होती. हे सारे चित्र आता भारतीय उद्योगपतीच्या साह्याने बदलण्यात येणार आहे.

आरएएस पद्धतीत नेमके वेगळे काय?

सध्या कोळंबीची शेती केली जाते. त्याला सेमिइंटेन्सिव्ह कल्चर सिस्टिम असेही म्हटले जाते. त्यासाठी खुली तळी वापरली जातात. स्वाभाविक त्याला अधिक जागा लागते; मात्र आरएएस पद्धतीत पाण्याचा पुनर्वापर केला जातो आणि पाण्याच्या गुणधर्मांवरही नियंत्रण केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT