esakal 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Flood : कृष्णाकाठी महापुराचं सावट! कोयनेतून 30 हजार, तर आलमट्टीतून 2.75 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्यात २४ तासांत तब्बल ८ टीएमसीची वाढ झाली.

सकाळ डिजिटल टीम

आलमट्टीतून विसर्गच सुरू नाही अशा स्वरूपाचे व्हिडिओ आज समाज माध्यमांवरून व्हायरल होत होते. आलमट्टीतून विसर्ग सुरू आहे.

सांगली : कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्यात २४ तासांत तब्बल ८ टीएमसीची वाढ झाली. पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहचला. त्यामुळे आज धरणातून तातडीने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ११ हजार १५० क्युसेक, तर रात्री उशिरा 20 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. तर आज सकाळी 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

त्याचवेळी कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणी पातळीत २४ तासांत ४ फुटांची वाढ झाली असून, आयर्विन पुलाजवळ पातळी ३४ फुटांवर पोहचली आहे. पाणी इशारा पातळीकडे (४० फूट) सरकत असल्याने कृष्णाकाठी चिंतेचे सावट दाटले आहे. पुढील दोन दिवसांतील पावसाच्या स्थितीवर सगळे अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

कृष्णा नदीची पाणी पातळी आज झपाट्याने वाढली. सायंकाळी पाच वाजता ३३ फूट पाणी होते. सातच्या सुमारात सहा इंच वाढ झाली आणि रात्री ते ३४ फुटांवर पोहोचले. ही वाढ पावसाच्या पाण्याची आहे. कोयनेतील फक्त १०५० क्युसेकचा विसर्ग यामध्ये समाविष्ट आहे. तो उद्यापासून २० हजार क्युसेक इतका असेल. त्यामुळे पाऊस असाच राहिला आणि धरणातील विसर्ग वाढवावा लागला तर शनिवारपर्यंत पाणी पातळी इशारा पातळीकडे म्हणजे ४० फुटांवर जाऊ शकते. त्यादृष्टीने आज जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी सुरू केली. या पट्ट्यातील लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले.

वारणेत ३० टीएमसी

वारणा धरणातील पाणीसाठा आज ३० टीएमसीवर पोहोचला असून, त्यातून १० हजार ४६० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या पाणी पातळीवर वाढ होण्याची शक्यता आहे.

आलमट्टीकडे लक्ष

आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत आज सर्व पातळ्यांवरून आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्यानंतर २ लाख ७५ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. तो गरजेनुसार साडेतीन लाख क्युसेक इतका करण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संमती दर्शवल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आलमट्टी धरणातील साठा आता ८८ टीएमसीपर्यंत खाली आला असून, ती जमेची बाजू आहे. सध्या धरणातील येवा १ लाख ७६ जरा क्युसेक आहे.

खोटे व्हिडिओ व्हायरल

आलमट्टीतून विसर्गच सुरू नाही अशा स्वरूपाचे व्हिडिओ आज समाज माध्यमांवरून व्हायरल होत होते. आलमट्टीतून विसर्ग सुरू आहे. तो टप्प्याटप्प्याने साडेतीन लाख क्युसेकपर्यंत वाढवत नेण्यात येईल, असे कर्नाटकातील जलसंपदा विभागाकडून स्पष्‍ट करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्राचे अधिकारी सातत्याने संपर्क ठेवून आहेत. भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवितहानी नको - पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘कोयना धरण ७५ टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे आता दहा हजार क्युसेकने पाणी सोडावे लागणार आहे. त्याचा परिणाम सांगलीवर होऊ शकतो. संभाव्य पूर पट्ट्यातील लोकांना आत्ताच स्थलांतरित करा. निवारा केंद्रात जेवणासह सर्वतोपरी साहाय्य करा. त्यासाठी शाळा, मंगल कार्यालये ताब्यात घ्या. एनडीआरएफची टीम आणखी हवी असेल तर पाठवता येईल. कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्या. पुण्यात धरणातून सोडलेल्या पाण्याचा त्रास झाला आहे, तशी परिस्थिती सांगलीत होऊ नये याची दक्षता घ्यावी.’’

एका नजरेत स्थिती

  • कोयना पाणलोट क्षेत्रात बुधवारपासून अतिवृष्टी

  • धरणात २४ तासांत ८ टीएमसी साठा

  • धरण ७८ टीएमसी भरल्यामुळे तातडीने विसर्ग

  • १०५० वरून ११ हजार १५० क्युसेकने विसर्ग

  • आलमट्टी धरणातून विसर्ग २ लाख ७५ हजारांवर नेला

  • आलमट्टीतील साठा ८८ टीएमसीपर्यंत खाली आणण्यात यश

  • सांगलीत स्मशानभूमीत पाणी

  • पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

  • मदतीसाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मैदानात

  • कर्नाळ रस्त्यावर रात्री सव्वादहा वाजता पुराचे पाणी शिरू लागले.

महाराष्ट्र-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची चर्चा

सातारा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी साताऱ्यात कोयना धरण साठ्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहवाल दिला. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून आलमट्टीचा विसर्ग वाढवण्याबाबत विनंती केली. सांगलीतून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेऊन सांगलीतील परिस्थितीची माहिती दिली. महापूर नियंत्रण समितीच्या विजयकुमार दिवाण यांच्याशी देसाई यांचा संवाद त्यांनी घडवला. त्यांनी कोयनेतून अतिरिक्त विसर्ग अडचणीचा ठरेल, शनिवारनंतर विसर्ग करावा, आलमट्टीचा विसर्ग अधिक वाढवून मगच त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका दिवाण यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT