newase
newase 
पश्चिम महाराष्ट्र

शनिआमवस्येनिमित्त लाखो भाविक शनैश्वर चरणी

सुनील गर्जे

नेवासे : शनी अमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शुक्रवार रात्रीपासून शनिवार (ता. ५) साडेदहा वाजेपर्येंत सुमारे चारलाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. आज शनि अमवस्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे.

अमवस्येच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच शनिभक्तांनी भगवान शनैश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शनी आमवस्येचे निमित्त पहाटेच ऑस्ट्रेलियाचे शनिभक्त उद्योगपती राकेशकुमार, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, यांच्या हस्ते महापूजा व आरती झाली. देवस्थानच्या वतीने यासर्वांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, भाविकांच्या वाढत्या गर्दीने परिसर फुलुन गेला होता. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन-अडीच किलोमीटर अंतरावर वाहनतळ करण्यात आले आहे. देवस्थानच्या वतीने वाहनतळ, पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे आज चौथ-यावरील दर्शन बंद करण्यात आले आहे. आत्तापर्येंत पोलिसांच्या व देवस्थानच्या कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत ठेवली आहे.  
आज दिवसभरात विविध राज्यातील भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक रोहिदार पवार, शेवगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवाशाचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, शनिशिंगणापुरचे पोलिस निरीक्षक ललित पांडुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठेवण्यात आला आहे.

पोलिस बंदोबस्त असा...
*अप्पर पोलिस अधिक्षक : 1 *उपविभागीय पोलिस अधिकारी : 1 *पोलिस निरीक्षक : 5  *पोलिस उपनिरीक्षक : 7.  *पोलिस कर्मचारी : 250  *राखीव दल (तुकड्या) : 2.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT