leave Miraj BJP during the alliance uddhav thackeray politics sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

युतीवेळी मिरज भाजपला सोडणे चूकच; उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे ; सांगली जिल्ह्याकडे विशेष लक्ष देणार, निष्ठावंतांसोबत फोटोसेशन

सकाळ वृत्तसेवा

सांगली : ‘‘मिरज विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडणे ही चूकच होती. ती आता सुधारू, मिरजेत पुन्हा शिवसेना वाढवू. त्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन. क्रांतिकारकांचा जिल्हा शिवसेनेला साथ देईल, असे काम उभे करा’’, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. जिल्हा प्रमुख संजय विभुते, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महिला आघाडी प्रमुख सुजाता इंगळे आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी शिवसेनेच्या निष्ठावंतांसोबत फोटोसेशनही केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जमिनीवर भारतीय बैठक घालत ठाकरेंसोबत छायाचित्र काढून घेतले.

‘ही वेळ टळेल, एकजुटीने लढूया’, असेही त्यांनी आश्‍वस्त केल्याचे विभुते यांनी सांगितले. श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यात शिवसेना फारशी रुजत नाही, असे मला वाटत होते. त्यामुळे तिकडे थोडे दुर्लक्ष झाले. मिरजेसारखा प्रमुख मतदारसंघ युतीमध्ये भाजपला सोडून चूक केली. आता हिंदुत्ववादी जिल्हा म्हणून ताकदीने काम करू. एकजुटीने संघटनात्मक बांधणी ताकदीने करा. मी स्वतः सांगलीत लक्ष घालणार आहे. दिवस असेच राहणार नाहीत. ते पालटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकियांविरुद्ध अधिक लढाया कराव्या लागल्या. आपल्यालाही तेच करावे लागत आहे. शेवटी विजय शिवरायांचा झाला. आताही शिवसेनाच जिंकेल. कठीण काळात तुम्ही सोबत राहिलात, हा विजयच आहे.’’

जिल्हा प्रमुख विभुते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ८० टक्के पदाधिकारी सोबत आहेत. तुमची मुख्यमंत्री म्हणून केलेली कामे मनात, हृदयात आहेत. सर्वांची आस्था कायम आहे. गद्दारी झाली असली तरी महाराष्ट्राला सगळं कळलं आहे. लोक बोलत आहेत.’’

मयूर घोडके, चंदन चव्हाण, रूपेश मोकाशी, रणजित जाधव, हरिदास लेंगरे, मारुती पवार, नागनाथ मोटे, सरोजनी माळी, मनीषा पाटील, सनी कोरे, मयूर गायकवाड, पप्पू शिंदे, महादेव हुलवान, सुभाष मोहिते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: १२ तास ट्रॅफिक जाम! मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रात्रभर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान

Lac Or Lakh: चेकवर 'Lakh' लिहावं की ‘Lac’? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT