akkalkot
akkalkot 
पश्चिम महाराष्ट्र

विवेकानंद प्रतिष्ठान गणेशोत्सव व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेस मोठ्या उत्साहात 14 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला. एकूण सात दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचा प्रारंभ ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी महर्षी विवेकांनद संस्थेचे मल्लिनाथ कल्याणशेटटी, जेष्ठ नागरिक अॅड. विलास फुटाणे, सुभाष गडसिंग, बाबासाहेब निंबाळकर, मुकुंद पतकी, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेटटी आदींची उपस्थिती होती. ख्यातनाम व्याख्याते अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी बाजीराव प्रतापसूर्य या विषयावर पहिले पुष्प गुंफताना सांगितले की, श्रीमंत थोरले बाजीराव छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे वीर योध्दे होते. सुमारे पावणेदोन लाख किलोमीटर पेक्षा जास्त घोडयावरून प्रवास करून 41 लढाया जिंकलेले लढवये योध्दे होते. पण आपण त्यांचा इतिहास चित्रपटापुरता मर्यादीत करून अवघ्या 17 महिन्याचा सहवास लाभलेल्या मस्तीनी सोबत जोडुन त्यांच्या अतुलनीय युद्धनीतीचा अनादर करत आहेत.

दोन तृतीयांश हिंदुस्थान एकछत्राखाली आणणारे बाजीराव प्रतापसूर्य होते.त्यानंतर दुसरे पुष्प कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी शहरी नक्षलवाद या विषयावर गुंफले,त्या म्हणाल्या की माओवाद आता काही भागांपुरता मर्यादीत न राहता तो आपल्या दारांपर्यँत आला आहे.दलित माओवादी बनत नसुन माओवादी आंबेडकरीवाद याचा बुरखा पांघरून त्यांच्या प्रश्नांना हात घालुन तरूणांना जाळयात ओढु पाहतात. त्यांना दलित संघटना नामशेष करावयाच्या आहेत.ते पोलीसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत असतात. यासाठी  काळाची पावले ओळखुन माओवाद रोखण्यासाठी समाजात जागृती करणे गरजेचे आहे.विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, अशोक येणगुरे, शशिकांत लिंबीतोटे, संतोष जिरोळे, मल्लिनाथ मसुती, गुरुपादप्पा आळगी, नितीन पाटील, महेश कापसे, चंद्रकांत दसले, एस.व्ही.कलबुर्गी, व्ही.एस.तळवार, मलकप्पा भरमशेटटी, विलास बिराजदार, एस.बी.माने आदीसह रसिक श्रोते उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक के.डी.सुर्वे, विलास तळवार, राजेश पडवळकर, लोकापुरे  आदीसह महिला नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT